आरोपीकडून पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला केडगाव येथील घटना: रिव्हॉल्वर पळविले
By admin | Published: July 10, 2015 11:13 PM2015-07-10T23:13:32+5:302015-07-10T23:13:32+5:30
अहमदनगर: नगर महाविद्यालय आवारातील मारहाण प्रकरणातील आरोपी किरण कदम यास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीसह त्याच्या साथीदारांनी अचानक तुफान दगडफेक करत पोलीस उपनिरीक्षक राजेश हिंगोले यांचे रिव्हॉल्वर पळविले़ दरम्यान यावेळी झालेल्या झटापटीत पसार झालेला आरोपी कदम यास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून, दगडफेकीत जखमी हिंगोले यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात रात्री उशिराने दाखल करण्यात आले़ या घटनेने केडगाव परिसरात खळबळ उडाली आहे़
Next
अ मदनगर: नगर महाविद्यालय आवारातील मारहाण प्रकरणातील आरोपी किरण कदम यास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीसह त्याच्या साथीदारांनी अचानक तुफान दगडफेक करत पोलीस उपनिरीक्षक राजेश हिंगोले यांचे रिव्हॉल्वर पळविले़ दरम्यान यावेळी झालेल्या झटापटीत पसार झालेला आरोपी कदम यास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून, दगडफेकीत जखमी हिंगोले यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात रात्री उशिराने दाखल करण्यात आले़ या घटनेने केडगाव परिसरात खळबळ उडाली आहे़ येथील नगर महाविद्यालयात तीन दिवसांपूर्वी दोन गटात जबर मारहाण झाली होती़ तेव्हापासून या प्रकरणातील आरोपी कदम याच्या पोलीस मागावर होते़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोनी व राजेश हिंगोले यांच्यासह पोलीस पथकाने कदम यास पकडण्यासाठी केडगाव येथील रेणुकामाता मंदिर परिसरात सापळा लावला़ पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले़ ते आरोपीला घेऊन येत असतानाच मंदिर परिसरातून अज्ञात व्यक्तींनी अंधाराचा गैरफायदा घेऊन पोलिसांवर तुफान दगडफेक केली़ पोलिसांनी दगडफेक करणार्यांकडे मोर्चा वळविला़ मात्र त्याचवेळी आरोपी कदम याने पळून जाण्याचा प्रयत्न केला़ तो पोलिसांच्या तावडीतून निसटला़ तेवढ्यात आरोपीच्या साथीदाराने हिंगोले यांचे रिव्हॉल्वर हिसकावून पळ काढला़ यावेळी झालेल्या झटापटीत हिंगोले यांच्या डोक्याला मार लागला़ ते जखमी झाले़ मात्र सोनी यांच्या मदतीने त्यांनी आरोपी कदम याच्यासह त्याच्या साथीदारांना जेरबंद केले़ जखमी हिंगोले यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती़