चोरट्याने घातली पोलिसांच्या अंगावर दुचाकी नेरी नाकाजवळील घटना : सिनेस्टाईल झटापट; चोरीसाठी घेतले भाड्याचे घर; तीन दुचाकी जप्त; क्रमांक बदलवून गहाण

By Admin | Published: February 5, 2016 12:33 AM2016-02-05T00:33:03+5:302016-02-05T00:33:03+5:30

जळगाव: पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आल्याचे लक्षात येताच सचिन उर्फ नाना हरि धनगर (रा.धरणगाव ह.मु.गोपाळपुरा, जळगाव) या चोरट्याने गुरुवारी सकाळी आठ वाजता नेरी नाका ट्रॅव्हल्स थांब्याजवळ पोलिसांच्या अंगावर दुचाकी नेऊन पळण्याचा प्रयत्न केला. सिनेस्टाईल झटापटीत जिल्हा पेठ गुन्हे शाखेचे छगन तायडे व अल्ताफ पठाण या दोन कर्मचार्‍यांनी खरचटले आहे. दरम्यान, सचिन याला पकडण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

The incident near the busy Nari Naka near the police station, the thief was seized; House for rent stolen; Three bikes seized; Mortgage by changing the number | चोरट्याने घातली पोलिसांच्या अंगावर दुचाकी नेरी नाकाजवळील घटना : सिनेस्टाईल झटापट; चोरीसाठी घेतले भाड्याचे घर; तीन दुचाकी जप्त; क्रमांक बदलवून गहाण

चोरट्याने घातली पोलिसांच्या अंगावर दुचाकी नेरी नाकाजवळील घटना : सिनेस्टाईल झटापट; चोरीसाठी घेतले भाड्याचे घर; तीन दुचाकी जप्त; क्रमांक बदलवून गहाण

googlenewsNext
गाव: पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आल्याचे लक्षात येताच सचिन उर्फ नाना हरि धनगर (रा.धरणगाव ह.मु.गोपाळपुरा, जळगाव) या चोरट्याने गुरुवारी सकाळी आठ वाजता नेरी नाका ट्रॅव्हल्स थांब्याजवळ पोलिसांच्या अंगावर दुचाकी नेऊन पळण्याचा प्रयत्न केला. सिनेस्टाईल झटापटीत जिल्हा पेठ गुन्हे शाखेचे छगन तायडे व अल्ताफ पठाण या दोन कर्मचार्‍यांनी खरचटले आहे. दरम्यान, सचिन याला पकडण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
जिल्हा पेठचे रवी नरवाडे, राजू मेंढे व छगन तायडे आदी जण रात्री पेट्रोलिंगला असताना गुरुवारी पहाटे साडे तीन वाजता आकाश सूर्यवंशी (वय १९ रा.गोपाळपुरा, जळगाव) हा तरुण पेट्रोल चोरीच्या उद्देशाने सहा ते सात बाटल्या घेऊन फिरताना मानराज पार्कजवळ आढळून आला. त्याची या तिघांनी चौकशी केली असता त्याने पेट्रोल चोरीची कबुली दिली. यावेळी कर्मचार्‍यांनी पोलीस निरीक्षक शाम तरवाडकर यांना घटनास्थळावर यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यांनीही लागलीच घटनास्थळी धाव घेतली. आकाशला त्याचा ठाव ठिकाणा विचारला असता मानराज पार्क परिसरात भाड्याच्या घरी त्याने पोलिसांना नेले. तेथे ड्रील मशीन, टॉमी आदी साहित्य आढळून आले. हे साहित्य मित्र नाना धनगर याने बांधकामावरुन चोरल्याची माहिती त्याने दिली.

दोन हजार रुपये घेवून बोलावले
आकाश याला ताब्यात घेतल्यानंतर नाना धनगरला ताब्यात घेण्यासाठी सकाळी साडे सात वाजता पोलिसांनी आकाशच्या माध्यमातून त्याला फोन करुन बोलावले. मला पोलिसांनी पकडले आहे, दोन हजार रुपये घेवून सोडून देणार आहेत, त्यासाठी तू पैसे घेवून नेरी नाक्यावर ये असा निरोप दिल्यानंतर नाना हा विना क्रमांकाच्या स्पार्टस् बाईकने तेथे आला. छगन तायडे यांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच त्याने त्यांना झटका मारुन दुचाकी फिरवली. ती दुचाकी त्याने अल्ताफ पठाण यांच्या अंगावर नेली. पठाण याने गचांडी धरल्याने तो दुचाकीसह खाली कोसळला. अन्य सहकारी राजू मेंढे व रवी नरवाडे यांनी त्याला पकडून पोलीस स्टेशनला आणले.

Web Title: The incident near the busy Nari Naka near the police station, the thief was seized; House for rent stolen; Three bikes seized; Mortgage by changing the number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.