नौदलाची युद्धनौका INS Vikramaditya मध्ये आग, बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 08:24 AM2022-07-21T08:24:25+5:302022-07-21T08:25:45+5:30

INS Vikramaditya : आयएनएस विक्रमादित्य सध्या कारवार बंदरात आहे. आग लागल्यानंतर जहाजातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राचा वापर करून आग विझवण्यात आली.

incident of fire on board navy aircraft carrier ins vikramaditya karwar karnataka | नौदलाची युद्धनौका INS Vikramaditya मध्ये आग, बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश

नौदलाची युद्धनौका INS Vikramaditya मध्ये आग, बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश

Next

INS Vikramaditya : कर्नाटकातील कारवार बंदरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौका INS विक्रमादित्यला आग लागल्याची घटना घडली आहे. आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेला बुधवारी सायंकाळी उशिरा आग लागली. नौदलाच्या युद्धनौकेला आग लागल्याची घटना घडल्यानंतर काही वेळातच ती आटोक्यात आणण्यात आली.

जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आग लागल्यानंतर जहाजातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राचा वापर करून आग विझवली. यावेळी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. भारतीय नौदलाची सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका, INS विक्रमादित्य जगातील १० सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धनौकांमध्ये समाविष्ट आहे. या युद्धनौकेची लांबी २८३.५ मीटर आहे. त्याचं बीम ६१ मीटर आहे. ही एक कीव-श्रेणीतील मॉडिफाईड विमानवाहू युद्धनौका आहे. ही युद्धनौका २०१३ मध्ये भारतीय नौदलात सामील झाला होती.

याची डिस्प्लेसमेंट ४५,४०० टन आहे. या युद्धनौकेवर ३६ लढाऊ विमानं तैनात केली जाऊ शकतात. यामध्ये २६ मिकोयान MiG-29K मल्टी रोल फायटर्स आणि Kamov Ka-31 AEW&C आणि Kamov Ka-28 ASW हेलिकॉप्टर्स सामील आहेत.

Web Title: incident of fire on board navy aircraft carrier ins vikramaditya karwar karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.