क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी जोशी पेठेतील रात्रीची घटना : पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने निवळला तणाव
By admin | Published: April 19, 2016 12:49 AM2016-04-19T00:49:44+5:302016-04-19T00:49:44+5:30
जळगाव : येथील जोशी पेठ भागात रविवारी रात्रीच्या सुमारास ऑटोरिक्षाचा हॉर्न वाजविल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन तणाव निर्माण झाल्याची घटना घडली़ या घटनेमुळे परिसरात रात्रीच्या सुमारास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Next
ज गाव : येथील जोशी पेठ भागात रविवारी रात्रीच्या सुमारास ऑटोरिक्षाचा हॉर्न वाजविल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन तणाव निर्माण झाल्याची घटना घडली़ या घटनेमुळे परिसरात रात्रीच्या सुमारास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशीपेठेतील रहिवासी ऑटोरिक्षाचालक किशोर बाबुराव चौधरी (वय ४०) हे रविवारी रात्रीच्या सुमारास जोशीपेठेत आल्यानंतर त्यांनी रिक्षाचा हॉर्न वाजविला. या गोष्टीचा राग आल्याने तेथील नटू खाटीक, अझहर खाटीक यांनी रिक्षाचा हॉर्न का वाजविला? अशी विचारणा करीत चौधरी यांच्याशी वाद घातला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या घटनेत किशोर चौधरी यांना फायटरने मारहाण झाल्याने त्यांना दुखापत झाली. ही घटना जोशी पेठेतील शैलेंद्र प्रोव्हिजन जवळ घडली़ घटनेची माहिती कळताच शनिपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी घटनास्थळी जात परिस्थिती आटोक्यात आणली. या घटनेमुळे जोशी पेठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस पहाटेपर्यंत घटनास्थळी ठाण मांडून होते. या घटनेसंदर्भात किशोर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील संशयितांविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अशोक महाजन करीत आहेत.तिघांची चौकशीदरम्यान, या घटनेनंतर सोमवारी शनिपेठ पोलिसांनी सकाळच्या सुमारास तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.