वर्दळीच्या रस्त्यावरील फोटो स्टुडिओत चोरी न्यायालयासमोरील घटना : दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला

By admin | Published: July 29, 2016 06:29 PM2016-07-29T18:29:40+5:302016-07-29T18:29:40+5:30

जळगाव : कोर्ट चौकातून ख्वॉजामियॉँ दर्ग्याकडे जाणार्‍या वर्दळीच्या रस्त्यावर; न्यायालयासमोर असलेले गुरुमा डिजिटल फोटो स्टुडिओ हे दुकान अज्ञात चोरट्यांनी २८ रोजी पहाटेच्या सुमारास फोडले. चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत दीड लाख रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लांबवल्या. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Incidents in front of theft court in the photo studio on Wardali road: Taken up to one and a half lakh rupees | वर्दळीच्या रस्त्यावरील फोटो स्टुडिओत चोरी न्यायालयासमोरील घटना : दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला

वर्दळीच्या रस्त्यावरील फोटो स्टुडिओत चोरी न्यायालयासमोरील घटना : दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला

Next
गाव : कोर्ट चौकातून ख्वॉजामियॉँ दर्ग्याकडे जाणार्‍या वर्दळीच्या रस्त्यावर; न्यायालयासमोर असलेले गुरुमा डिजिटल फोटो स्टुडिओ हे दुकान अज्ञात चोरट्यांनी २८ रोजी पहाटेच्या सुमारास फोडले. चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत दीड लाख रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लांबवल्या. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा उपनगरातील संत मीराबाई नगरातील केदार देवेंद्र बोरसे (वय ३०) यांचे न्यायालयासमोर गुरुमा डिजिटल फोटो स्टुडिओ नावाचे दुकान आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते याठिकाणी फोटोग्राफीचा व्यवसाय करीत आहेत. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे साडेनऊ वाजेच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत दुकानातून सुमारे १ लाख ६६ हजार ९९० रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चोरून नेल्या.
सकाळी घटना उघडकीस
शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता नेहमीप्रमाणे केदार बोरसे हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना शटर तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी दुकानात पाहणी केली असता, दुकानातील संगणक, व्हिडिओ व फोटो कॅमेरे, एलइडी टीव्हीसह इतर किरकोळ वस्तू व काही रोख रक्कम चोरीस गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हापेठ पोलिसांनी येऊन पाहणी केली. हा परिसर जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलिसांनी त्यांना फिर्याद देण्यास सांगितले. त्यानुसार केदार बोरसे यांनी दुपारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला. तपास सहायक पोलीस निरीक्षक हिरे करीत आहेत.
हा मुद्देमाल गेला चोरीस
२९ हजारांचे तीन संगणक, १२ हजारांचा एलइडी टीव्ही, ५० हजारांचे दोन व्हिडिओ कॅमेरे, ६० हजारांचे तीन फोटो कॅमेरे, ४ हजाराची एक हार्डडिस्क, ३०० रुपयांचा पेनड्राइव्ह, ५०० रुपयांचे वायफाय राऊटर व ११९० रुपये रोख असा एकूण १ लाख ६६ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

Web Title: Incidents in front of theft court in the photo studio on Wardali road: Taken up to one and a half lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.