शहरात भरदिवसा घरफोडी मुक्ताईनगर कॉलनीतील घटना : ३४ हजाराचा ऐवज लांबविला
By admin | Published: January 22, 2016 12:10 AM2016-01-22T00:10:06+5:302016-01-22T00:10:06+5:30
फोटो
Next
फ टोजळगाव : चोरी व घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू झाले असून गुरुवारी मुक्ताईनगर कॉलनीत भरदिवसा जयंत रामदास पेठकर (वय ४५) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने असा मिळून ३३ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पेठकर हे व्यापारी तर त्यांच्या पत्नी नलिनी या शिक्षिका आहेत. पेठकर गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता व्यापारानिमित्त बाहेर गावी गेले होते तर त्यांच्या पत्नी या पावणे सात वाजताच शाळेत गेल्या होत्या. दोघं मुलही शाळेतच होते. नलिनी पेठकर या दुपारी पावणे दोन वाजता शाळेतून घरी आल्या असता घराला कुलूप नव्हते,फक्त कडी लावलेली होती. घरात प्रवेश केल्यावर कपाटात उघडे होते व त्यातील सामान जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेला होता. त्यावरुन घरात चोरी झाल्याचा अंदाज नलिनी यांना आला. कपाटात ठेवलेले साडे सोळा हजार रुपये रोख, चार हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅमचे चांदीचे अकरा दागिने, तेरा हजार ३३० रुपये किमतीचे पाच ग्रॅमची साखळी व एक ग्रॅमचा शिक्का गायब झालेला दिसला. त्यांनी हा प्रकार पती जयंत यांना सांगितला. घरात चोरी झाल्याची माहिती जिल्हा पेठ पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक श्याम तरवाडकर, उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख, गुन्हे शाखेचे राजू मेंढे, रवी नरवाडे, अल्ताफ पठाण आदींनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. परिसरातील नागरिकांकडून माहिती जाणून घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.