चोरट्याला बदडले तृतीयपंथीयांनी राजीव गांधी नगरातील घटना : एकाला अटक तर दुसरा फरार

By admin | Published: January 19, 2016 11:04 PM2016-01-19T23:04:40+5:302016-01-19T23:04:40+5:30

जळगाव: झोपेत चोरी करताना रंगेहाथ पकडलेल्या करतारसिंग हुकूमसिंग टाक (वय ३०,रा.राजीव गांधी नगर, जळगाव) याला तृतीयपंथी तसेच रहिवाशांनी बदडून पोलिसांच्या स्वाधीन केले.यातील दुसरा चोरटा मिथुनसिंग टाक हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. हा प्रकार सोमवारच्या मध्यरात्री व मंगळवारच्या पहाटे अडीच वाजेच्या सुमारास राजीव गांधी नगरात घडला.

Incidents of thieves in Rajiv Gandhi city: One arrested and second absconding | चोरट्याला बदडले तृतीयपंथीयांनी राजीव गांधी नगरातील घटना : एकाला अटक तर दुसरा फरार

चोरट्याला बदडले तृतीयपंथीयांनी राजीव गांधी नगरातील घटना : एकाला अटक तर दुसरा फरार

Next
गाव: झोपेत चोरी करताना रंगेहाथ पकडलेल्या करतारसिंग हुकूमसिंग टाक (वय ३०,रा.राजीव गांधी नगर, जळगाव) याला तृतीयपंथी तसेच रहिवाशांनी बदडून पोलिसांच्या स्वाधीन केले.यातील दुसरा चोरटा मिथुनसिंग टाक हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. हा प्रकार सोमवारच्या मध्यरात्री व मंगळवारच्या पहाटे अडीच वाजेच्या सुमारास राजीव गांधी नगरात घडला.
राजीव गांधी नगरात राहणार्‍या करिश्मा संजना सोनवणे (वय ३२) हे झोपेत असताना करतारसिंग व मिथुन यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. करिश्मा यांच्या कमरेला असलेली कापडी पिशवी चोरुन त्यातील सहा हजार रुपये रोख व दोन मोबाईल घेऊन जाण्याच्या तयारीत असताना करिश्मा यांना जाग आली. करतासिंग याला पकडले. आरडाओरड होत असल्याने शेजारी लागलीच धावून आले. दोघांना बदडताना मिथून हा तेथून फरार झाला तर करतारसिंग याला नागरिकांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला आणले. तेव्हा पावणे तीन वाजले होते. पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांनीही पोलीस स्टेशन गाठले. करतासिंग याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्या.प्रतिभा पाटील यांनी २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Incidents of thieves in Rajiv Gandhi city: One arrested and second absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.