पाठ्यक्रमात धार्मिक पुस्तके व मूल्यशिक्षणाचा समावेश करा, मनेका गांधी यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 02:06 AM2018-03-12T02:06:32+5:302018-03-12T02:06:32+5:30
विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक सहिष्णुता वाढावी, यासाठी शालेय पाठ्यक्रमात धार्मिक पुस्तके व मूल्यशिक्षणाचा समावेश करण्याची सूचना केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांची मनुष्यबळ विकास मंत्रालयास केली आहे.
नवी दिल्ली - विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक सहिष्णुता वाढावी, यासाठी शालेय पाठ्यक्रमात धार्मिक पुस्तके व मूल्यशिक्षणाचा समावेश करण्याची सूचना केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांची मनुष्यबळ विकास मंत्रालयास केली आहे.
केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या ६५ व्या बैठकीत मनेका गांधी यांनी ही सूचना केली. शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च निर्णय घेणारे हे मंडळ आहे. विविध धर्मांच्या विद्यार्थ्यात अधिकाधिक सहिष्णुता वाढावी, हा यामागचा उद्देश आहे. यासाठी पाठ्यक्रमात मूल्यशिक्षण आणि धार्मिक पुस्तकांचा समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
ओडिशाचे शिक्षणमंत्री बद्रीनारायण पात्रा यांचीही या वेळी उपस्थिती होती. धार्मिक सहिष्णुता आणि देशभक्ती वाढावी, यासाठी पाठ्यक्रमात संशोधन करण्याची सूचना त्यांनी केली. माध्यान्ह भोजनात शाकाहारी मेनू असावा आणि शाळेत हजेरी घेताना मॅम किंवा सरऐवजी जय हिंद म्हटले जावे, एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात आवश्यक तो बदल करावा, अशा सूचनाही या वेळी आल्या.