अंतिम पैसेवारीत १२९५ गावांचा समावेश प्रस्ताव रवाना : २०६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त

By admin | Published: December 16, 2015 11:49 PM2015-12-16T23:49:39+5:302015-12-16T23:49:39+5:30

जळगाव : जिल्‘ातील १५ तालुक्यांमधील १५०१ गावांच्या हंगामी (नजर) पैसेवारीनंतर आता अंतिम पैसेवारीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आला आहे. यात १२९५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे. तर २०६ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त आहे.

Inclusion of 12 9 5 villages in the last pay motion will take place: 206 villages are more than 50 paise | अंतिम पैसेवारीत १२९५ गावांचा समावेश प्रस्ताव रवाना : २०६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त

अंतिम पैसेवारीत १२९५ गावांचा समावेश प्रस्ताव रवाना : २०६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त

Next
गाव : जिल्‘ातील १५ तालुक्यांमधील १५०१ गावांच्या हंगामी (नजर) पैसेवारीनंतर आता अंतिम पैसेवारीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आला आहे. यात १२९५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे. तर २०६ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे १५ सप्टेंबर रोजी हंगामी (नजर) पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर राज्यशासनाने दृष्काळसदृष्य गावांची घोषणा केली होती. १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने अंतिम पैसेवारी जाहीर केली. त्यात मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावांची वाढ झाली आहे.
तालुकानिहाय गावांची संख्या पुढीलप्रमाणे
जळगाव तालुक्यातील ९२, जामनेर १५२, एरंडोल ६५, धरणगाव ८९, भुसावळ ५४, यावल १०, रावेर १९, मुक्ताईनगर ८१, बोदवड ५१, पाचोरा १२८, चाळीसगाव १३६, भडगाव ६३, अमळनेर १५४, पारोळा ११४, चोपडा ८७ या गावांचा समावेश आहे.
चोपडा, यावल व रावेर तालुक्यातील गावांची संख्या जास्त
अंतिम पैसेवारीत रावेर तालुक्यातील १०२, यावल तालुक्यातील ७४, चोपडा तालुक्यातील ३० गावांची अंतिम पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भातील एकत्रित अहवाल शासनाकडे पाठविला आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होऊन दुष्काळाची अधिकृत घोषणा होणार आहे.

Web Title: Inclusion of 12 9 5 villages in the last pay motion will take place: 206 villages are more than 50 paise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.