सर्वसमावेशक विकास हाच प्राधान्यक्रम

By Admin | Published: February 23, 2015 11:20 PM2015-02-23T23:20:03+5:302015-02-23T23:20:03+5:30

संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली़ सर्वसमावेशक विकास हाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे राष्ट्रपतींनी

Inclusive growth is the priority | सर्वसमावेशक विकास हाच प्राधान्यक्रम

सर्वसमावेशक विकास हाच प्राधान्यक्रम

googlenewsNext

नवी दिल्ली : संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली़ सर्वसमावेशक विकास हाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले़
आपल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली़ ‘सबका साथ, सबका विकास’ हेच केंद्र सरकारचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले़ जनतेच्या इच्छा आणि आकांक्षेनुरूप संसदेत प्रगतिशील कायदे आणण्यासाठी सरकार कायम प्रयत्नशील असेल, असेही ते म्हणाले़ सदस्यांनी परस्पर सहकार्य आणि सद्भावनेसह संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्यावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले़
ग्रामविकास, गरिबी निर्मूलन, रोजगार वाढ यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत २०२२ पर्यंत सर्वांना निवारा देण्यास सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले़ जन-धन योजनेअंतर्गत देशात १३़२ कोटी खाती उघडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले़ कौशल्य विकासावर भर देत, सर्वांचा सर्वसमावेश विकास हेच माझ्या सरकारचे ध्येय आहे़ सबका साथ, सबका विकास हेच माझ्या सरकारचे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले़
वादग्रस्त भूसंपादन कायद्याला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून विरोध सुरू असताना, या कायद्यातील प्रस्तावित बदलामुळे विकास साध्य होईल, असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात केले़ भूसंपादन विधेयकातील बदल विकासासाठी आवश्यक आहे़ भूसंपादनामुळे प्रभावित शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन यात बदल केले गेले आहेत़ दरम्यान, राज्यसभेवर निवडून आल्यानंतर गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी पुन्हा निवड झाली आहे. मीर मोहम्मद फयाज, नझीर अहमद लावे (दोघेही पीडीपी), शमशेरसिंग मनहास (भाजप) यांच्यासह आझाद यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Inclusive growth is the priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.