भारतीयांचे उत्पन्न ८ वर्षांत ३५.१२% वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 06:50 AM2023-08-03T06:50:25+5:302023-08-03T06:51:54+5:30

२०१२-१३ मध्ये देशाचे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ७२,८०५ रुपये इतके होते.

Income of Indians increased by 35.12% in 8 years | भारतीयांचे उत्पन्न ८ वर्षांत ३५.१२% वाढले

भारतीयांचे उत्पन्न ८ वर्षांत ३५.१२% वाढले

googlenewsNext

नवी दिल्ली : सन २०१४-१५ च्या तुलनेत देशाची दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात यंदा सुमारे ३५.१२% वाढ होत ती ९८,३७४ रुपयांवर पोहोचली. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी लोकसभेत या संदर्भात माहिती दिली.

३१ मे २०२३ रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०१२-१३ मध्ये देशाचे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ७२,८०५ रुपये इतके होते. त्यानंतर गत आठ वर्षांमध्ये त्यात सुमारे ३५.१२% वाढ होत ती ९८,३७४ रुपये झाली. तसेच सरकारने नागरिकांचे दरडोई उत्पन्न दुप्पट करण्याची कोणतीही योजना नसल्याचे सिंह यांनी उत्तरात सांगितले.
 

Web Title: Income of Indians increased by 35.12% in 8 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.