प्राप्तिकर विभागाने शोधला परदेशातील 16,200 कोटींचा ब्लॅक मनी
By admin | Published: February 7, 2017 08:09 PM2017-02-07T20:09:43+5:302017-02-07T20:09:43+5:30
प्राप्तिकर विभागाने गेल्या काही काळात भारतीयांनी परदेशात लपवण्यात आलेला सुमारे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - केंद्र सरकारने काळ्या पैशाविरोधात सुरू केलेल्या कारवाईला आता यश मिळू लागले आहे. प्राप्तिकर विभागाने गेल्या काही काळात भारतीयांनी परदेशात लपवण्यात आलेला सुमारे 16 हजार 200 कोटींचा काळा पैसा शोधून काढला आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत दिली आहे.
"शिस्तबद्धपणे केलेल्या तपासामुळे गेल्या दोन वर्षांत एचएसबीसी बँकेतील परदेशातील खात्यांमधून 8 हजार 200 कोटी रुपयांची रक्कम कराच्या चौकटीत आणण्यात आली आहे. तसेच आयसीआयजेने प्रसिद्ध केलेल्या भारतीयांच्या परदेशातील खात्यांमधून अजून आठ हजार कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाली आहे," अशी माहिती जेटलींनी संसदेत दिली. मात्र भारतीयांचा किती काळा पैसा परदेशात आहे याबाबत कोणताही अचूक अंदाज वर्तवता येणार नाही, असेही जेटलींनी सांगितले.
परदेशातील काळा पैसा परत देशात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. तसेच परदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी सर्वप्रकारची पावले उचलण्यात येत असल्याचेही जेटलींनी सांगितले.