जयललिता यांच्या निवासस्थानी आयकर विभागाच्या अधिका-यांनी घेतली झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 02:10 AM2017-11-19T02:10:30+5:302017-11-19T02:11:39+5:30

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री स्व. जे. जयललिता यांच्या निवासस्थानामुळे प्रसिद्ध असलेल्या पोएस गार्डन इमारतीतील एका कार्यालयात आयकर विभागाच्या अधिका-यांनी झाडाझडती घेतली.

Income Tax Department officials took Jayalalitha's residence to plant | जयललिता यांच्या निवासस्थानी आयकर विभागाच्या अधिका-यांनी घेतली झाडाझडती

जयललिता यांच्या निवासस्थानी आयकर विभागाच्या अधिका-यांनी घेतली झाडाझडती

googlenewsNext

चेन्नई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री स्व. जे. जयललिता यांच्या निवासस्थानामुळे प्रसिद्ध असलेल्या पोएस गार्डन इमारतीतील एका कार्यालयात आयकर विभागाच्या अधिका-यांनी झाडाझडती घेतली.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, तुरुंगात असलेल्या पदच्युत अद्रमुक नेत्या व्ही. के. शशिकला यांच्या वापरातील एक खोली आणि कार्यालय ब्लॉकमध्ये अधिकाºयांनी तपासणी केली. वेदा निलयम नावाने ही इमारत ओळखली जाते.
अधिकाºयांनी सांगितले की, आम्ही पोएस गार्डनचा संपूर्ण परिसर तपासला नाही. आमच्या अधिकाºयांनी पूनगुंडरन यांची खोली, रेकॉर्ड असलेली खोली आणि शशिकला यांनी वापरलेली एक खोली तपासली. पूनगुंडरन हे जयललिता यांचे विश्वासू सहकारी होते. या तपासात एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.
शशिकला, त्यांचे नातेवाईक आणि काही सहकाºयांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने तब्बल १८७ ठिकाणी नुकतेच छापे मारले आहेत. याच छाप्यांचा भाग म्हणून पोएस गार्डनमधील ही कारवाई करण्यात आली.
छाप्याचे वृत्त कळताच जयललिता यांची भाची जे. दीपा यांनी घटनास्थळी धाव घेतली. तथापि पोलिसांनी त्यांना पोएस गार्डन निवासस्थानात प्रवेश करू दिला नाही.

Web Title: Income Tax Department officials took Jayalalitha's residence to plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Chennaiचेन्नई