तामिळनाडूतील आरोग्यमंत्र्यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी
By admin | Published: April 7, 2017 12:35 PM2017-04-07T12:35:51+5:302017-04-07T12:35:51+5:30
तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सी. विजय भास्कर यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 7 - तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सी. विजय भास्कर यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. याव्यतिरिक्त दोन आमदार आणि काही औषध कंपन्यावर छापेमारी करत धडक कारवाई करण्यात आली आहे. अजूनही आयकर विभागाची छापेमारी मोहीम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी सकाळी तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सी. विजय भास्कर यांच्या चेन्नईतील घरावर आयकर विभागाच्या पथकाने छापेमारी करत खळबळ उडवली.
सीआरपीएफ जवानांच्या बंदोबस्तात आयकर विभागाचं पथक राज्याचे आरोग्य मंत्री, त्यांचे नातेवाईक आणि 10-12 औषध कंपन्यांवर छापेमारी करत आहेत. सोबत राज्यातील दोन आमदारांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. आयकर विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री आणि त्यांच्यासंबंधी काही जणांनी पोटनिवडणुकीदरम्यान काळ्या पैशांचा वापर केल्याची माहिती समोर आली. आतापर्यंत चेन्नईत जवळपास 32 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. शिवाय पथकाचा तपास अद्याप सुरू असल्याचीही माहिती आहे.
छापेमारी करणा-या पथकातील एका अधिका-याने सांगितलं की, आर.के. नगर परिसरात विजय भास्कर यांनी मतदारांना पैसे वाटल्याची तक्रार चार जणांकडून करण्यात आली होती. यामुळे आरोग्यमंत्री आणि त्यांचे नातेवाईक आयकर विभागाच्या रडारवर आहेत.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान विजय भास्कर यांचं नाव चर्चेत होते. माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी मला बाजूला हटवण्यात विजय भास्कर यांचा हात असल्याचा आरोपही केला होता. शिवाय पार्टी सोडण्यासाठी दबाव टाकल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
तर दुसरीकडे, आता आयकर विभागानं भास्कर यांच्या घरावर मारलेल्या छापेमारी कारवाईमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते.
IT raid at Tamil Nadu Health Minister C Vijaya Baskar residence at Greenways road, also at other locations including Pudukkottai and Trichy pic.twitter.com/McE4zI9JJz
— ANI (@ANI_news) April 7, 2017