आयकर विभागाकडून 4 हजार 200 कोटींची 'डर्टी कॅश' जप्त

By admin | Published: December 30, 2016 09:07 AM2016-12-30T09:07:45+5:302016-12-30T09:54:23+5:30

8 नोव्हेंबरला नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यापासून देशभरात एकूण 1000 सर्व्हे, सर्च ऑपरेशन आणि जप्तीची कारवाई करण्यात आली

Income tax department seized 'Dirty Cash' of 4,200 crore | आयकर विभागाकडून 4 हजार 200 कोटींची 'डर्टी कॅश' जप्त

आयकर विभागाकडून 4 हजार 200 कोटींची 'डर्टी कॅश' जप्त

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करणा-यांवर आयकर विभागाची बारीक नजर असून देशभरात धाडसत्र सुरु आहे. आयकर विभागाने आतापर्यंत पाच हजाराहून जास्त नोटीस पाठवल्या आहेत. तसंच तब्बल 4500 कोटींची अघोषित संपत्ती जप्त केली आहे. 8 नोव्हेंबरला नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यापासून देशभरात एकूण 1000 सर्व्हे, सर्च ऑपरेशन आणि जप्तीची कारवाई करण्यात आली. फक्त 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान असे 200 सर्च ऑपरेशन करण्यात आले. 
 
सर्व्हे म्हणजे कागदपत्रं, पुस्तकं आणि संपत्तीची छाननी तर सर्च आणि जप्ती म्हणजे धाडीची कारवाई करण्यात आली. आयकर विभागाला छापेमारीत रोख, सोनं याशिवाय इतर महागड्या वस्तूही हाती लागल्या असून सर्व जप्त करण्यात आलं आहे. कारवाईदरम्यान 458 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून यामधील 105 कोटी रक्कम नव्या 500 आणि 1000 च्या नोटांच्या स्वरुपात आहे. हा सर्व पैसा घर आणि कार्यालयात लपवून ठेवण्यात आला होता. 
 
रोख रक्कम हा काळ्या पैशाचा एक छोटासा भाग आहे. सोनं, महागड्या गाड्या, संपत्ती आणि अन्य अघोषित संपत्तीच्या स्वरुपात हा काळा पैसा लपवून ठेवण्यात आला आहे, ज्याची छाननी करणं अजून बाकी आहे. बँकांमधील सर्व डाटा गोळा केला जात असून व्यवहारांवरही बारीक लक्ष ठेवण्यात आलं आहे. आयकर विभाग याकरिता सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि सीबीआयचीदेखील मदत घेत आहे. 
 
8 नोव्हेंबरपासून ते आतापर्यंत एकूण 500 प्रकरणं ईडी आणि सीबीआयकडे पाठवण्यात आली आहेत. बँकांच्या 547 शाखांवर आयकर विभागाची नजर आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वत: ईडीने 10 बँकांच्या 50 शाखांची तपासणी केली आहे. नोटाबंदी निर्णयानंतर बँकांमधील व्यवहारात मोठी वाढ झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 
 

Web Title: Income tax department seized 'Dirty Cash' of 4,200 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.