Income Tax Raid : आयकर विभागाची मोठी कारवाई, देशातील 50 ठिकाणी छापेमारी; काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 11:07 AM2022-09-07T11:07:10+5:302022-09-07T11:16:03+5:30

Income Tax Raid : करचुकवेगिरीप्रकरणी दिल्लीतील अनेक व्यावसायिक आयकर रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे. जयपूरमध्येही व्यावसायिकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.

income tax raid in over 50 places in country over political funding from delhi to uttarakhand and rajasthan | Income Tax Raid : आयकर विभागाची मोठी कारवाई, देशातील 50 ठिकाणी छापेमारी; काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

Income Tax Raid : आयकर विभागाची मोठी कारवाई, देशातील 50 ठिकाणी छापेमारी; काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

Next

नवी दिल्ली : देशभरात विविध ठिकाणी आयकर विभागाची (Income tax department) कारवाई सुरु आहे. आज राजकीय फंडिंग प्रकरणी आयकर विभागाकडून देशभरात 50 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीपासून उत्तराखंड आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये आयकर विभागाची पथके पोहोचली आहेत. करचुकवेगिरीप्रकरणी दिल्लीतील अनेक व्यावसायिक आयकर रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे. जयपूरमध्येही व्यावसायिकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.

राजस्थानमध्ये माध्यान्ह भोजनातून कमाई करणाऱ्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये गृह राज्यमंत्री असलेल्या राजेंद्र यादव आणि मिड डे मील बिझनेस ग्रुपवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मंत्री राजेंद्र यादव यांचा कोतपुतळी येथे पोषण आगार कारखाना आहे. दरम्यान, आतापर्यंत आयकर विभागाची पथके 50 हून अधिक ठिकाणी पोहोचली आहेत. 

या छापेमारीत 300 हून अधिक पोलिसांचा सहभाग आहे. आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये 100 वाहनेही वापरली जात आहेत. जयपूर जिल्ह्यातील कोतपुतळी इथेही छापे टाकण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या जवानांनाही सोबत घेतले आहे. राजस्थानसोबतच दिल्ली, महाराष्ट्र, उत्तराखंडमध्येही छापेमारी सुरु आहे.

बंगळुरू-मुंबईतही छापेमारी
बंगळुरूमध्येही आयकर विभागाच्या छाप्यांची माहिती समोर आली आहे. मणिपाल ग्रुपवरही आयकर विभागाने छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. बंगळुरूमध्ये 20 हून अधिक ठिकाणी आयकर विभागाचा शोध सुरू आहे, सर्वांवर करचुकवेगिरीचे आरोप आहेत. मिड डे मिल घोटाळा प्रकरणी मुंबईतही आयकर विभागाचे छापे सुरू आहेत. येथे आयकर विभागाची पथके 4-5 ठिकाणी छापे टाकत आहेत. आयकर विभागाला काही विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर छापे टाकण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

गेल्या महिन्यात महाराष्ट्रात छापेमारी
दरम्यान, गेल्या महिन्यात महाराष्ट्रात  24 ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यावेळी 48 वाहनं आणि 50 अधिकारी होते. यामध्ये पंढरपूरमधील उद्योजक अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्याशी निगडित असलेल्या तीन साखर कारखान्यांवर देखील आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. तसेच सोलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहुल कन्स्ट्रक्टवर धाडी टाकल्या होत्या. सोलापुरात सात ठिकाणी छापेमारी केली होती. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रावर व्यक्ती रडारवर होते. कृषी पाहणी शिबीरासाठी आलो असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या होत्या.

Web Title: income tax raid in over 50 places in country over political funding from delhi to uttarakhand and rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.