Income Tax Raid: आयकर विभागाची युपीत धडक कारवाई; 22 ठिकाणी छापे, अनेक उच्च पदस्त अधिकारी रडावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 01:39 PM2022-08-31T13:39:39+5:302022-08-31T13:41:17+5:30
IT Raid Uttar Pradesh: अनेक भ्रष्ट ब्यूरोक्रेट आणि विविध विभागातील उच्चपदस्त अधिकारी आयटीच्या रडावर आहेत.
UP Income Tax Raid: आयकर विभागाने बुधवारी यूपीमध्ये भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. आयकर विभागाने एकाच वेळी 22 ठिकाणी छापे टाकले. दिल्लीसह लखनौ आणि कानपूरमध्येही आयकराचे छापे सुरू आहेत. अनेक भ्रष्ट नोकरशहा आणि विविध खात्यांमध्ये काम करणारे अधिकारी आयकर विभागाच्या रडारवर आहेत.
या विभागांचे अधिकारी रडारवर
आयकर विभागाने अनेक कंत्राटदारांवरही छापे टाकले आहेत. प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी सांगितले की, डझनभर भ्रष्ट नोकरशहा रडारवर आहेत. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईमुळे उत्तर प्रदेशातील अनेक विभागांमध्ये कार्यरत सुमारे दीड डझन अधिकारी-कर्मचारी रडारवर आले आहेत. उद्योग विभाग, उद्योजकता विकास संस्था, उद्योजकता प्रशिक्षण संस्था, यूपी इंडस्ट्रियल कन्सल्टंट लिमिटेड, खाजगी क्षेत्र, इत्यादी क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर छापे सुरू आहेत.
ITचे अनेक राज्यांमध्ये छापे
ऑगस्ट महिन्यात फक्त उत्तर प्रदेशच नाही तर अनेक राज्यांमध्ये आयकर विभागाने छापे टाकले आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीस, प्राप्तिकर विभागाला गुजरातमधील एका मोठ्या उद्योग समूहात 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बेहिशेबी व्यवहार आढळून आले. खेडा, अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता या भागात 58 ठिकाणी सुमारे चार ते पाच दिवस छापे टाकण्यात आले.
महाराष्ट्रातही छापे
इकडे, जालना येथेही स्टील व्यावसायिकांच्या घरावर छापा टाकून प्राप्तिकर विभागाने 390 कोटी रुपयांची रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. 260 अधिकाऱ्यांच्या आयकर विभागाच्या पाच पथकांनी आठवडाभर छापे टाकले. हा छापा टाकण्यासाठी एजन्सीने 120 वाहनांचा वापर केला. त्यांच्याकडून सुमारे 58 कोटी रुपये रोख, 32 किलो सोने आणि मौल्यवान रत्ने जप्त करण्यात आली.