आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, करदात्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 11:56 AM2018-07-27T11:56:42+5:302018-07-27T12:05:10+5:30

केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक पत्रक जारी करून माहिती दिली

Income tax return filing deadline extended to August 31 | आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, करदात्यांना दिलासा

आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, करदात्यांना दिलासा

Next

नवी दिल्ली - इनकम टॅक्स (आयटी) रिटर्न भरण्याची मुदत एका महिन्याने वाढवण्यात आल्याने करदात्यांना दिलासा मिळाला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख दिली होती. मात्र आता ही मुदत वाढवून 31 ऑगस्ट  देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक पत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. 



करदात्यांनी वेळेत कर भरला नाही तर पाच  ते दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पाच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या करदात्याने 31 जुलै ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत आयटी रिटर्न भरल्यास त्याला पाच हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तर करदात्याने 31 डिसेंबर 2018 नंतर आयटी रिटर्न भरल्यास त्याला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. 



 

Web Title: Income tax return filing deadline extended to August 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर