गेल्या वर्षी तुम्ही रिटर्न्स (आयकर परतावा) भरले नव्हते का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 12:29 PM2018-07-31T12:29:49+5:302018-07-31T12:30:18+5:30
काही लोकांना आयकर परतावा भरता आला नाही तर काय करायचे हा प्रश्न उरतोच. तसेच गेल्या वर्षीही काही लोकांना परतावा भरणे अनेक कारणांमुळे शक्य झाले नसावे. त्यांनी काय करावे?
मुंबई- 31 जुलै तारिख जवळ येते तशी आयकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न्स) भरण्यासाठी सर्वांची लगबग सुरु होते. आयकर परतावा भरण्यासाठी संबंधित आर्थिक वर्षाची साधारणपणे 31 जुलै ही शेवटची तारिख असते. अर्थाच 2017-18 या आर्थिक वर्षाचा परतावा भरण्यासाठी ही मुदत 31 ऑगस्ट 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु तरिही काही लोकांना आयकर परतावा भरता आला नाही तर काय करायचे हा प्रश्न उरतोच. तसेच गेल्या वर्षीही काही लोकांना परतावा भरणे अनेक कारणांमुळे शक्य झाले नसावे.
वेळेत आयकर परतावा न भरण्याचे अनेक तोटे आहेत त्यामुळे आयकर परतावा वेळेत भरावा असेच आवाहन सर्वांना केले जाते. आयकर परतावा वेळेत न भरल्यास तुमच्यावर व्याजही देण्याची वेळ येऊ शकते, तुम्हाला दंड होऊ शकतो.
सरकारने जाहीर केलेल्या विहित वेळेत जर आयकर परतावा भरता आला नाही तर त्या आर्थिक वर्षाचा शेवट होण्याआधी आपल्याला परतावा भरता येतो. याचाच अर्थ 31 मार्च पर्यंत आयकर परतावा भरता येतो. 2016-17 या आर्थिक वर्षासाठीच्या परताव्यासाठी मात्र त्यासाठी 5000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.
2017-18 या आर्थिक वर्षाच्या परताव्यास उशिर झाल्यास
5 लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना 1000 रुपयांचा दंड होईल.
5 लाखांहून अधिकचे करयोग्य उत्पन्न असणाऱ्यांना या आर्थिक वर्षात 31 डिसेंबरपर्यंत परतावा भरल्यास 5000 रुपये दंड होईल आणि त्यानंतर भरल्यास 10, 000 रुपये दंडापोटी द्यावे लागतील.