प्राप्तिकर परतावा १५ दिवसांत मिळणार
By Admin | Published: March 8, 2016 03:09 AM2016-03-08T03:09:20+5:302016-03-08T03:09:20+5:30
प्राप्तिकर परतावा मिळण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सोमवारी नवे निर्देश जारी केले असून, यानुसार आता १५ दिवसांत संबंधित करदात्याच्या
मुंबई : प्राप्तिकर परतावा मिळण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सोमवारी नवे निर्देश जारी केले असून, यानुसार आता १५ दिवसांत संबंधित करदात्याच्या खात्यामध्ये परतावा जमा होणार आहे.
प्राप्तिकर परताव्याच्या रखडलेल्या प्रकरणांचा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आढावा घेत सध्या असलेल्या व्यवस्थेला अधिक गतिमान करण्यासाठी नवी योजना आखली आहे. यानुसार सध्या ३० दिवसांच्या कालावधीत प्राप्तिकर परताव्याची प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया घटवून नवा कालावधी १५ दिवस असा निश्चित करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी चालू आर्थिक वर्षापासूनच अर्थात तातडीने करण्यात येणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात परतावा अपेक्षित असलेल्या करदात्यांच्या खात्यात आता परतावा लवकरच जमा होईल. (प्रतिनिधी)