सर्व प्रमुख खरीप पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ; आर्थिक बाबींबिषयक समितीची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 05:25 AM2019-07-04T05:25:58+5:302019-07-04T05:30:02+5:30
आधारभूत किंमती टप्प्याटप्प्याने वाढवून शेतक-यांचे उत्पन्न सन २०२४ पर्यंत दुप्पट करण्याचा सरकारचा इरादा आहे.
नवी दिल्ली : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास खर्चाच्या किमान दीडपट भाव देण्याचे सूत्र कायम ठेवून केंद्र सरकारने सन २०१९-२० या हंगामातील सर्व प्रमुख खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबीविषयक समितीने यास मंजुरी दिली. याचा देशभरातील ८६ टक्के अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ होईल, असा दावा आहे. बाजार भाव या किमान आधारभूत भावापेक्षा खाली गेले तर सरकारने या भावाने शेतमाल खरेदी करायचा, अशी ही योजना आहे. अन्न महामंडळ व इतर संस्था तृणधान्यांची, नाफेड कडधान्यांची व कापूस महामंडळ व नाफेड कपाशीची.
शेतमाल आधारभूत किमतींना खरेदी करण्यात या संस्थांना जो तोटा होईल, त्याची भरपाई केंद्र सरकार करेल. आधारभूत किंमती टप्प्याटप्प्याने वाढवून शेतक-यांचे उत्पन्न सन २०२४ पर्यंत दुप्पट करण्याचा सरकारचा इरादा आहे.
आधारभूत किंमतीतील वाढ
भात (धान) (सामान्य) ६५
भात (धान) ( ए ग्रेड) ६५
ज्वारी (हायब्रीड) १२०
ज्वारी (मालदांडी) १२०
बाजरी ५०
नाचणी २५३
मका ६०
तूर १२५
मूग ७५
उडीद १००
भूईमुग २००
सूर्यफूल २००
सूर्यफूल
(पिवळे)३११
तीळ २३६
जवस६३
कपाशी (लांब)१०५
कपाशी (मध्यम)१००
(प्रति क्विंटल रुपयांत)