महाराष्ट्रात बाल लैंगिक शोषणाच्या तक्रारींमध्ये वाढ; केंद्राची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 04:20 AM2020-03-07T04:20:41+5:302020-03-07T04:21:02+5:30
महाराष्ट्रात लैंगिक शोषणाच्या तक्रारीत गेल तीन वर्षात वाढ दिसून आली आहे. कपिल पाटील यांनी यासंबंधी लेखी प्रश्न विचारला.
नवी दिल्ली: मोठ्या प्रमाणावर जागरूकता कार्यक्रम राबवणे, शिवाय कठोर कायद्याचा परिमाण दिसला नाही. महाराष्ट्रात लैंगिक शोषणाच्या तक्रारीत गेल तीन वर्षात वाढ दिसून आली आहे. कपिल पाटील यांनी यासंबंधी लेखी प्रश्न विचारला. केंद्र सरकारच्या उत्तरामुळे महाराष्ट्रात अशा तक्रारीत सातत्याने वाढ आढळली.
२०१६ साली महाराष्ट्रात १४ हजार ५५९ तक्रारींची नोंद झाली. पुढच्या वर्षी त्यात वाढ होऊ न आकडा १६ हजार ९१८ वर पोहोचला. २०१८ साली १८ हजार ८९२ तक्रारी पोलिसांकडे आल्या. अर्थात अनेक प्रकरणांची तक्रारच केली जात नसल्याने हा आकडा जास्त होता. केंद्रीय दूरसंचार मंत्रालय, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने कायदा कठोर केला आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफीवर निर्बंध आहेत. असे व्हिडीओ पाहणे, सोशल मीडियावर पाठवणे गुन्हा आहे. पालकांना जागरूक केले जात आहे. मात्र त्याचा परिणाम अद्याप दिसला नाही.
>दूध भेसळ चिंताजनक : दूध व दूग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ गंभीर मुद्दा आहे. राहुल शेवाळे यांनी यासंबंधी केंद्र सरकारला लेखी प्रश्न विचारला. २०१६ साली महाराष्टातून १८१७ नमुने गोळा केले होते. त्यापैकी ३५९ नमुने भेसळयुक्त होते. दिल्लीत ८ पैकी एका नमुन्यात भेसळ होती. प्रमुख कंपन्यांच्या उत्पादनांची तपासणी केली. त्यात ६ हजार ४३२ नमुन्यांपैकी ४० टक्के नमुने भेसळयुक्त आढळले.
>महाराष्ट्रातील जंगलात आगी : जंगलात लागणाऱ्या आगी रोखण्यात केंद्राला यश आले नाही. प्रताप जाधव यानी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरामुळे आकडेवारीच समोर आली आहे. महाराष्ट्रातील आगीच्या संख्या तशीच आहे.२०१७ साली ५८८९, पुढच्या वर्षी ३४९० तर मागील वर्षी ३२२१ वेळा आगी लागल्या. त्यात अनुक्रमे ४२, ५० व ५४ लाखांची वनसंपदा जळाली.
>सूरजकुंड मेळ्यात १५०० कारागीर : देश व सार्क राष्ट्रांमधील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ सूरजकुंड मेळा असल्याचे केंद्राने म्हटले आहे. डॉ. हीना गावित व सुनील तटकरे यांनी प्रश्न विचारला होता. सूरजकुंड मेळ््यात यंदा १५०० कारागीर सहभागी झाले. त्यात १३४४ भारतीय तर सार्क राष्ट्रांमधील ३१ कलाकार होते.
>जाहिरातीचे कठोर नियम : अल्पवयीन मुलांना आकर्षीत करण्यासाठी अनेक दुकानांमध्ये तंबाखू, सिगरेट व तत्सम पदार्थांच्या जाहीराती, पॅकेट्स लटकवण्यात येतात का, असा प्रश्न अरविंद सावंत व कृपाल तुमाने यांनी विचारला. आरोग्य मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेत विस्तृत्त उत्तर दिले. तंबाखू, सिगरेट, गुटख्याच्या जाहीरातीसाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ज्याचे उल्लंघन खपवून घेतले जात नाही, असे केंद्राने म्हटले आहे.