कॉलनी एरियात अतिक्रमणात वाढ
By admin | Published: June 20, 2016 12:23 AM2016-06-20T00:23:25+5:302016-06-20T00:23:25+5:30
कॉलनी एरियात तर अतिक्रमणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रिंगरोडवरील जैन पेट्रोल पंपासमोरील गिरणा पाटबंधारेच्या भिंतीलगत खानावळ, माठ विक्रेत्यांचे अतिक्रमण कायम आहे. याबाबत अतिक्रमण विभाग सोयीस्करपणे कारवाई करण्याचे टाळत असल्याने हप्ते वसुली होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अशीच परिस्थिती गिरणा टाकीच्या भिंतीलगतच्या अतिक्रमणांची आहे. या भिंतीलगत मोठ्या प्रमाणावर पक्के अतिक्रमण झाले आहे. तसेच रामानंदनगर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. याभागाची जबाबदारी सोपविलेल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्यांकडून सर्रास हप्तेवसुली होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ होत आहे. रामानंदनगर रस्त्यालगतही फळविक्रेत्यांकडून अतिक्रमण वाढविले जात आहे. मात्र अतिक्रमण विभाग सोयीस्करपणे दूर्लक्ष करीत्
Next
क लनी एरियात तर अतिक्रमणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रिंगरोडवरील जैन पेट्रोल पंपासमोरील गिरणा पाटबंधारेच्या भिंतीलगत खानावळ, माठ विक्रेत्यांचे अतिक्रमण कायम आहे. याबाबत अतिक्रमण विभाग सोयीस्करपणे कारवाई करण्याचे टाळत असल्याने हप्ते वसुली होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अशीच परिस्थिती गिरणा टाकीच्या भिंतीलगतच्या अतिक्रमणांची आहे. या भिंतीलगत मोठ्या प्रमाणावर पक्के अतिक्रमण झाले आहे. तसेच रामानंदनगर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. याभागाची जबाबदारी सोपविलेल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्यांकडून सर्रास हप्तेवसुली होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ होत आहे. रामानंदनगर रस्त्यालगतही फळविक्रेत्यांकडून अतिक्रमण वाढविले जात आहे. मात्र अतिक्रमण विभाग सोयीस्करपणे दूर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. नवीन आयुक्तांसमोर आव्हाननव्याने रूजू झालेले आयुक्त किशोर बोर्डे यांच्यासमोर या अतिक्रमणावर कारवाईचे आव्हान आहे. शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी नगरसेवक, आमदारांचा दबाव झुगारून कारवाई करण्याची हिंमत दाखवावी लागणार आहे. त्यासोबतच हप्ते वसुलीस चटावलेल्या अतिक्रमण विभागातील कर्मचार्यांनाही लगाम घालण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.