गुजरातमध्ये कौटुंबिक हिंसाचारात वाढ
By admin | Published: July 8, 2014 02:13 AM2014-07-08T02:13:12+5:302014-07-08T02:13:12+5:30
गेल्या वर्षभरात गुजरातमध्ये कौटुंबिक हिंसाचारात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र गुन्हा सिद्ध होण्याच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे.
Next
अहमदाबाद : गेल्या वर्षभरात गुजरातमध्ये कौटुंबिक हिंसाचारात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र गुन्हा सिद्ध होण्याच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) प्रसिद्धी केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष 2क्13 मध्ये गुजरातेत कौटुंबिक हिंसाचारात 1154 गुन्हे वाढले. त्यामुळे या राज्यात अशाप्रकारच्या गुन्ह्यांची संख्या 7812 झाली आहे. परंतु गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण केवळ 2.3क् टक्के आहे. हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कितीतरी कमी आहे. गुजरात 7812 प्रकरणांसह कौटुंबिक हिंसाचारात 28 राज्यांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. गुन्हा सिद्ध होण्यात तो 25 व्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, पती किंवा पतीच्या नातेवाईकांकडून अत्याचाराच्या (भादंवि कलम 498-अ) प्रकरणात वर्ष 2क्13 मध्ये 17.3 टक्क्यांची वाढ झाली. ही संख्या वर्ष 2क्12 मध्ये 6658 एवढी होती. मात्र दुसरीकडे राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वर्ष 2क्13 मध्ये केवळ 2.3क् टक्के होते. कौटुंबीक हिंसाचाराच्या वर्गवारीत हे प्रमाण राष्ट्रीय सरासरी 16 टक्के आहे. (वृत्तसंस्था)
4आकडेवारीनुसार, वर्ष 2क्13 मध्ये गुजरातमध्ये 12283 प्रकरणो महिलांवरील अत्याचाराची नोंदवण्यात आली. यातील 64 टक्के प्रकरणो कौटुंबिक हिंसाचार कायद्यांर्तगत येणारी आहेत.
4कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण 1.2 टक्क्यांहून 2.3क् टक्क्यांवर आले आहे. हे प्रमाण वर्ष 2क्12 मध्ये 3.5क् टक्के होते.