शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार
By admin | Published: June 17, 2017 11:14 PM2017-06-17T23:14:52+5:302017-06-17T23:14:52+5:30
रेंद्र मोदी सरकारने येत्या पाच वर्षांत सात कलमी कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे लक्ष्य ठरवले आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास
वडोदरा : नरेंद्र मोदी सरकारने येत्या पाच वर्षांत सात कलमी कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे लक्ष्य ठरवले आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे दिली.
देशाच्या वेगवेगळ््या राज्यांत शेतकऱ्यांत निर्माण झालेल्या अस्वस्थेच्या पार्श्वभूमीवर जावडेकर यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी मोदी यांनी या सात कलमी धोरणाला जाहीर केले होते. त्यात शेतकऱ्यांनापिकांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, उत्तम दर्जाची बियाणे आणि पीक काढल्यानंतर होणारे नुकसान टाळणे आदीचा समावेश होता. येथून ४० किलोमीटरवरील आणंद येथे शुक्रवारी जावडेकर यांच्या हस्ते मेकिंग आॅफ डेव्हलपड् इंडिया मेलाचे (मोदी फेस्ट) उद््घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. सात कलमांचा तपशील सांगताना जावडेकर म्हणाले की,‘‘पर ड्रॉप, मोअर क्रॉपद्वारे सिंचनावर मोठा भर असून त्यासाठी आर्थिक तरतूदही मोठी आहे. उत्तम दर्जाची बियाणे आणि प्रत्येक शेतजमिनीचा कस वाढवण्यासाठी पोषकघटक उपलब्ध करून देणे, गोदामांसाठी मोठी गुंतवणूक आणि कापणीनंतर पिकांची होणारी हानी टाळण्यासाठी शीतगृहांची साखळी निर्माण करणे तसेच अन्न प्रक्रियेद्वारे उत्पादनाची मूल्यवृद्धी करणे, राष्ट्रीय पातळीवर शेती बाजारपेठ तयार करणे, ५८५ स्टेशन्सवर ई प्लॅटफॉर्म तयार करणे, कुक्कुटपालन, मधमाशा पालन, मासेमारी आदी जोडव्यवसायाला प्रोत्साहन आणि परवडणाऱ्या किमतीत जोखीम कमी करणारी नवी विमा योजना सुरू करणे हे देखील या योजनेचे भाग आहेत.’’
निमकोटेड युरिया खताच्या छोट्या पिशव्या उपलब्ध झाल्यामुळे युरिया खताचा वापर कमी झाला असून त्यावरील वार्षिक अनुदानापोटीचे सात हजार कोटी वाचले आहेत, असेही जावडेकर म्हणाले.
पूर्वी शेतीतील उत्पादन वाढवण्याची पद्धत टाळून त्याऐवजी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर आमचा भर आहे, असे जावडेकर म्हणाले.
2022 पर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे ठरवले आहे.