कृषी मालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 07:02 AM2020-09-22T07:02:59+5:302020-09-22T07:03:06+5:30
केंद्र सरकारने दिला शेतकऱ्यांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२१-२२ या वर्षाच्या रब्बी पिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ५० ते ३०० रुपये अशी वाढवून दिली आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत सोमवारी यासंदर्भात घोषणा करताना नुकत्याच संसदेत संमत झालेल्या कृषी विधेयकांमुळे किमान आधारभूत किंमत व्यवस्था नष्ट होईल, ही शेतकऱ्यांना दाखवली जाणारी भीती निराधार आहे, अशा शब्दांत संतप्त शेतकºयांना दिलासा दिला. गव्हासाठी ही वाढीव किंमत ५० रुपये, चणा २५० रुपये, मोहरीसाठी २२५ व मसूर ३०० रुपये आहे.
विरोधी पक्षांनी मोठी टीका केलेल्या कृषी विधेयकांना रविवारी राज्यसभेत संमती मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. पंजाब व हरयाणात शेकडो शेतकरी संघटनांनी या विधेयकांच्या निषेधार्थ येत्या काही दिवसांत अनेक प्रकारच्या आंदोलनांचे आवाहन केले आहे. त्यात २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण बंदचाही समावेश आहे.
सुधारित किंमत
मसूर ५,१०० रुपये क्विंटल
मोहरी ४,६५० रुपये क्विंटल
सूर्यफूल ५,३२७ रुपये क्विंटल
गहू १,९७५ रुपये क्ंिवटल
जव १,६०० रुपये क्विंटल