मोबाइल परवान्याची मुदत वाढवून द्या
By admin | Published: June 27, 2017 12:26 AM2017-06-27T00:26:15+5:302017-06-27T00:26:15+5:30
राज्याच्या मालकीच्या एमटीएनएलने (महानगर टेलिफोन निगम लिमिटेड) दिल्ली, मुंबईतील मोबाइल लायसनची मुदत २०२१ पर्यंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राज्याच्या मालकीच्या एमटीएनएलने (महानगर टेलिफोन निगम लिमिटेड) दिल्ली, मुंबईतील मोबाइल लायसनची मुदत २०२१ पर्यंत कुठल्याही शुल्क आकाराशिवाय वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
एमटीएनएलचे सेल्युलर लायसन एप्रिल २०१९ पर्यंत वैध आहे. त्यानंतर एमटीएनएलचे अध्यक्ष पी. के. पूरवार यांनी दूरसंचार विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, एका खटल्यामुळे या सेवेची सुरुवात उशिरा झाली. लायसन मिळाल्यानंतर अडीच वर्षांनी स्पेक्ट्रमचे वाटप झाले होते.
एमटीएनएलच्या मोबाईल परवान्याची व्याप्ती खासगी दूरसंचार आॅपरेटरच्या बरोबरीची नाही. एमटीएनएलच्या वायरलेस ग्राहकांची संख्या दोन शहरात ३६ लाखांपर्यंत आहे. मोबाइल आणि लँडलाइन सेवेत वाढलेल्या स्पर्धेमुळे एमटीएनएलच्या महसूल आणि नफ्यावर थेट परिणाम झाला आहे. संपूर्ण दूरसंचार उद्योगच सध्या तणावाखाली असून यावर उपाययोजना सूचविण्यासाठी एक आंतरमंत्रालयीन गट तयार करण्यात आला आहे. एमटीएनएलने म्हटले आहे की, लायसनची मुदत २०२१ पर्यंत वाढविली जाऊ शकते.