दिवाळीचे संदेश पाठवून जवानांचे मनोबल वाढवा
By admin | Published: October 24, 2016 03:28 AM2016-10-24T03:28:36+5:302016-10-24T03:28:36+5:30
दिवाळीचे संदेश पाठवून जवानांचे मनोबल वाढवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. सिमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हे अभियान सुरु करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : दिवाळीचे संदेश पाठवून जवानांचे मनोबल वाढवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. सिमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हे अभियान सुरु करण्यात आले आहे.
हे संदेश नरेंद्र मोदी अॅप, मायजीओव्ही डॉट इन आणि आकाशवाणीच्या माध्यमातूनही पाठविता येतील. सैन्याच्या प्रति लोकांच्या भावना पोहचविण्यासाठी दूरदर्शनही एक कार्यक्रम सुरु करणार आहे.
या अभियानाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी व्टिट केले आहे की, मी ‘हॅशटॅग संदेश २ सोल्जर्स’ पाठवित आहे. आपणही असे करु शकतात. आपले संदेश निश्चित जवानांना मोठा आनंद देऊन जातील. या दिवाळीत आपल्या धाडसी जवानांच्या कर्तृत्वाला उजाळा देऊयात. जे जवान देशाचे संरक्षण करतात. जय हिंद. जेव्हा सव्वा कोटी लोक जवानांच्या सोबत उभे राहतील तेव्हा त्यांची ताकद सव्वा कोटी वेळेस वाढेल.
मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक विशेष व्हिडिओ जारी केला आहे. यात ते जवानांसाठी आपले संदेश पाठविण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. पीएमओ कार्यालयाने म्हटले आहे की, हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एका तासातच व्टिटर आणि फेसबूकवर या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, मोदी यांनी आपली गत दिवाळी सैन्याच्या सोबत साजरी केली होती.