'देशात मुस्लीम लोकसंख्या वाढल्यामुळेच बलात्कार अन् खून वाढले'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 02:04 PM2018-07-27T14:04:59+5:302018-07-27T14:35:25+5:30

उत्तर प्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार हरी ओम पांडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशातील बलात्कार आणि खून यांसारख्या घटनांना मुस्लीम समाजच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.

'Increase in Muslim population in country increases rape and murder' | 'देशात मुस्लीम लोकसंख्या वाढल्यामुळेच बलात्कार अन् खून वाढले'

'देशात मुस्लीम लोकसंख्या वाढल्यामुळेच बलात्कार अन् खून वाढले'

googlenewsNext

लखनौ - उत्तर प्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार हरी ओम पांडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशातील बलात्कार आणि खून यांसारख्या घटनांना मुस्लीम समाजच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. देशात मुस्लीम समाजाची वाढती संख्याच, बलात्कार आणि खून यांसारख्या घटनांना कारणीभूत असल्याचे पांडे यांनी म्हटले. तसेच जर मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर लवकरच आळा न बसल्यास आणखी एका पाकिस्तान राष्ट्राची निर्मित्ती व्हायला वेळ लागणार नाही, असेही पांडे यांनी म्हटले.

देशात घडणाऱ्या दहशतवादी कारवाया, खून आणि बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांस मुस्लीम समाजाची वाढती लोकसंख्याच कारणीभूत आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुस्लीम समाजाच्या लोकसंख्येत कमालीची वाढ झाल्याचे आपणास दिसून येईल. तर देशातील अर्थव्यवस्थेच्या कमतरतेला आणि बेरोजगारीलाही मुस्लीम समाजच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. नुकतेच लोकसंख्येला आळा घालण्यासंदर्भातील विधेयकावर संसंदेत चर्चा झाली होती, त्यानंतर पांडे यांनी हे वक्तव्य केले आहे. हे विधेयक संमत झाल्यास दुसरा पाकिस्तान निर्माण होण्यापासून देश वाचेल, असेही ते म्हणाले. 
दरम्यान, भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यांची स्पर्धा सुरुच असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच कर्नाटकतील भाजप आमदार बसनगौडा पाटील यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. जर, मी गृहमंत्री असतो, तर बुद्धिजीवी लोकांना गोळ्या घातल्या असत्या, असे पाटील यांनी कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हटले होते.



 

Web Title: 'Increase in Muslim population in country increases rape and murder'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.