RSS शाळांमधील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ
By admin | Published: June 20, 2016 01:06 PM2016-06-20T13:06:41+5:302016-06-20T13:09:23+5:30
भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून उत्तर प्रदेशात आरएसएसच्या शाळांमध्ये शिकणा-या मुस्लिम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाल्याचा दावा आरएसएसने केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
अलाहाबाद, दि. 20 - भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून उत्तर प्रदेशात आरएसएसच्या शाळांमध्ये शिकणा-या मुस्लिम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाल्याचा दावा आरएसएसने केला आहे. गेल्या 2 वर्षात विद्यार्थ्यांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली आहे. उत्तरप्रदेशातील आरएसएसच्या 1200 शाळांमध्ये एकूण 7 हजार मुस्लिम विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
आरएसएस त्यांच्या कट्टर हिंदुत्व विचारसरणीसाठी ओळखला जातो. शाळेत शिकणारे अनेक मुस्लिम विद्यार्थी गावाकडील आहेत. हे विद्यार्थी नियमाप्रमाणे श्लोक पठनदेखील करतात, तसंच अभ्यास आणि खेळातही उत्तम आहेत. सरस्वती शिशू मंदिर आणि सरस्वती विद्या मंदिरमधील अधिका-यांनी काही मुस्लिम विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेचं नाव उंचावलं असल्याचं सांगितलं आहे. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभ्यासात त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे.
मुस्लिम विद्यार्थ्यांचा आकडा वाढत असल्याने आरएसएसच्या विचारसरणीवर आरोप करणा-यांना उत्तर मिळाल्याचं आरएसएसचं म्हणण आहे. या शाळांमध्ये दिवसाची सुरुवात सुर्यनमस्काराने होते. तसंच राष्ट्रगीत वंदे मातरम आणि वैदिक मंत्रदेखील बोलले जातात.
विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी आसाममधील आरएसएसच्या एका शाळेत मुस्लिम विद्यार्थ्याने टॉप केलं होतं. आरएसएस मुस्लिमविरोधी नसून कोणत्याही धर्माविरोधात नाहीत. हे देशाच्या हितासाठी असून कोणतंही जातीयवाद धोरण नसल्याचं आरएसएसने बोलल्याचं सुत्रांकडून कळलं आहे.