पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
By admin | Published: April 16, 2017 12:46 AM2017-04-16T00:46:58+5:302017-04-16T00:46:58+5:30
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.
पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर 1.39 रुपये तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 1.04 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये पेट्रोलसाठी प्रतिलीटर 74.02 रुपये तर दिल्लीमध्ये प्रतिलीटर 67.04 रुपये मोजावे लागणार आहेत.
याआधी 1 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली होती. तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. त्यामुळे पेट्रोल प्रतीलिटर 3.77 रुपये तर डिझेल प्रतीलिटर 2.91 रुपयांनी स्वस्त झाले होते.
दरम्यान, येत्या 1 मेपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरणार आहेत. सुरुवातीला देशातील पाँडेचरी, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), उदयपूर (राजस्थान), जमशेदपूर (झारखंड) आणि चंदीगढ या पाच शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलताना दिसतील.