पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
By admin | Published: October 15, 2016 07:45 PM2016-10-15T19:45:39+5:302016-10-15T19:51:10+5:30
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाले आहेत.तेल कंपन्यांनी आधीच दोनवेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाले आहेत. प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात १.३४ रुपये आणि प्रतिलिटर डिझेलच्या दरात २.३७ रुपयांची वाढ झाली आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
पेट्रोल आणि डिझेल दोन्ही सरकारने नियंत्रण मुक्त केले असून, आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील किंमतीचा आढावा घेऊन सतत हे दर जास्त-कमी होत असतात. ऑक्टोंबर महिन्यात तेल कंपन्यांनी आधीच दोनवेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. एक ऑक्टोंबर आणि चार ऑक्टोंबर अशी दोनवेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली.
डिलर्सच्या कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी एकदा दर वाढवण्यात आले. डिझेल दरवाढीचा परिणाम महागाईच्या दरावर होत असतो. त्यामुळे डिझेल महागल्याचा काही प्रमाणात महागाईवर परिणाम होणार आहेत.