लागवड वाढत असल्याने दरांवर दबाव शक्य

By admin | Published: April 18, 2016 12:47 AM2016-04-18T00:47:34+5:302016-04-18T00:47:34+5:30

जळगाव- डाळिंब पिकात पैसा मिळतो म्हणून त्याची लागवड वाढत आहे. आपली जमीन कशी आहे... आपल्याकडे डाळिंब व्यवस्थितपणे येईल की नाही... याचा विचार न करता लागवड केली जाते. जेवढी लागवड वाढेल तेवढी मागणी असेलच असे नाही. प्रक्रिया उद्योग वाढले नाहीत तर डाळिंबाच्या दरांवर दबाव निर्माण होईल, असे मत पुणे येथील कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ.विनय सुपे यांनी शनिवारी व्यक्त केले.

As the increase in planting increases the pressure on the rates | लागवड वाढत असल्याने दरांवर दबाव शक्य

लागवड वाढत असल्याने दरांवर दबाव शक्य

Next
गाव- डाळिंब पिकात पैसा मिळतो म्हणून त्याची लागवड वाढत आहे. आपली जमीन कशी आहे... आपल्याकडे डाळिंब व्यवस्थितपणे येईल की नाही... याचा विचार न करता लागवड केली जाते. जेवढी लागवड वाढेल तेवढी मागणी असेलच असे नाही. प्रक्रिया उद्योग वाढले नाहीत तर डाळिंबाच्या दरांवर दबाव निर्माण होईल, असे मत पुणे येथील कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ.विनय सुपे यांनी शनिवारी व्यक्त केले.
जैन हिल्सवर आयोजित डाळिंब परिषदेत सुपे यांनी तांत्रिक सत्रात डाळिंबाचे खत व्यवस्थापन व गुणवत्ता याबाबत मार्गदर्शन केले.

दिवसाआड फवारणीची गरज नाही...
डाळिंब पिकावरील खर्च कमी व्हायला हवा. उत्पादक दिवसाआड फवारणी करतात. अनावश्यकपणे खते देतात. आपली जमीन कशी आहे याचा विचार करायला हवा. या अनावश्यक प्रकारामुळे उत्पादन खर्च वाढला आहे, असेही सुपे म्हणाले.
डाळिंब मूळचे इराणचे फळ
डाळिंब इराणचे फळ आहे. चीन, रशिया, मध्य आशिया असा प्रवास करीत हे फळ भारतात हिमाचल प्रदेशात आले. तेथून हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आदी भागात ते आले, अशी माहिती सुपे यांनी दिली.

तीन ते आठ टक्के चुनखडी नसली तरी चालेल...
डाळिंबाचे पीक ज्या जमिनीचा सामू ६.०, क्षारता ०.१० ते ०.५० डेसीसायमन मीटर आणि चुनखडी तीन ते आठ टक्के आहे, अशा जमिनीत चांगले येते, असा निष्कर्ष आहे. परंतु २० ते २२ टक्के चुनखडी असलेल्या जमिनीतही योग्य पाणी व खत व्यवस्थापनाने डाळिंब घेता येईल, असा दावा सुपे यांनी केला.

सात बाय सात फूटांवरील लागवडीचा धोका
डाळिंबाची लागवड सात बाय सात फूटांवर केली तर धोके वाढतात. १० बाय १५ फूट या अंतरात त्याची लागवड करणे योग्य आहे. यापेक्षा कमी अंतरात लागवड केली तर आर्द्रता वाढणे, हवा खेळती न राहणे, अशा समस्या निर्माण होतात आणि रोगराई वाढते. तेल्या रोग, अशा बागांमध्ये फोफावू शकतो, असे मतही सुपे यांनी व्यक्त केले.

सेंद्रीय मल्चींगमध्ये गव्हाचे कूट नको
बागेत सेंद्रीय मल्चींग (आच्छादन) करणे योग्य असते. पण गव्हाचे कूट टाकणे योग्य नाही. काड्या, पाला, पाचोळा, सोयाबीनच्या काढणीनंतर येणारा भुसा, गवत आदींचा वापर करता येईल. सेंद्रीय मल्चींग अतिशय लाभदायी असते, असेही सुपे यांनी सांगितले.
छाटणीची गरज नाही
पूर्वीच्या काळात डाळिंबाच्या बागांमध्ये छाटणीची गरज नसायची, पण अलीकडे छाटणीशिवाय बागच घेतली जात नाही. २५ रुपये प्रतिझाड, अशी मजुरी त्यासाठी वाया घालविली जाते. अशास्त्रीय पद्धतीने छाटणी केली जाते. शिवाय छाटणीनंतर लागलीच पाणी दिले जाते. पण त्यानंतर बागेला १० दिवस पाणी द्यायला नको. हलकी छाटणी करायला हवी, असेही सुपे म्हणाले.
फड पद्धतीने पाणी देऊ नये
डाळिंब बागेला फड पद्धतीने पाणी देऊ नये. ड्रीप वापरावे. तसेच खते व पाणी देण्यापूर्वी माती व पाणी परीक्षण करून घ्यावे, असे सुपे यांनी सांगितले.

Web Title: As the increase in planting increases the pressure on the rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.