चार राज्यांतील आमदारांना वेतनवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2016 03:29 AM2016-03-31T03:29:15+5:302016-03-31T03:29:15+5:30

आमदारांच्या विकास निधीत वाढ केल्यानंतर आता मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आमदारांच्या वेतनात मोठी वाढ करण्याच्या प्रस्तावाला या दोन्ही राज्यांच्या मंत्रिमंडळाने बुधवारी

Increase in wages for MLAs of four states | चार राज्यांतील आमदारांना वेतनवाढ

चार राज्यांतील आमदारांना वेतनवाढ

Next

भोपाळ/रायपूर : आमदारांच्या विकास निधीत वाढ केल्यानंतर आता मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आमदारांच्या वेतनात मोठी वाढ करण्याच्या प्रस्तावाला या दोन्ही राज्यांच्या मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. या प्रस्तावानुसार मध्य प्रदेशच्या आमदारांचे मासिक वेतन ७१ हजार रुपयांवरून १,१०,००० रुपये तर छत्तीसगडच्या आमदारांचे मासिक वेतन ७५ हजार रुपयांवरून १,१०,००० रुपये करण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशातील आमदारांचे वेतन व भत्ते यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील सर्व आमदारांना आता दरमहा ९५ हजार रुपयांऐवजी १ लाख २५ हजार रुपये मिळतील. मध्य प्रदेशमध्ये आता कॅबिनेट मंत्री असलेल्या आमदारांना दरमहा १.२० लाख रुपयांऐवजी १.७० लाख रुपये वेतन दिले जाईल. तर राज्यमंत्र्यांना दरमहा १.३ लाख रुपयांऐवजी १.५० लाख रुपये वेतन मिळेल. यापूर्वी आमदारांच्या विकासनिधीत मोठी वाढ करण्यात आली होती. मध्य प्रदेशपाठोपाठ छत्तीसगड सरकारनेही आमदारांच्या वेतनात वाढ केली आहे.

तेलंगण विधानसभेने मंगळवारीच मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती उपाध्यक्ष, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि सरकारी प्रतोद यांच्यासह आमदारांच्या वेतन आणि भत्त्यात वाढ केली. आमदारांना आता वेतन आणि भत्ते मिळून सुमारे दोन लाख रुपये दरमहा मिळणार आहेत.

Web Title: Increase in wages for MLAs of four states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.