भारतात 2015 मध्ये वाढली असहिष्णुता, USCIRFचा अहवाल

By Admin | Published: May 3, 2016 09:41 AM2016-05-03T09:41:37+5:302016-05-03T09:44:13+5:30

अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता आयोगाने दिलेल्या अहवालानुसार भारतात 2015मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन करणा-या घटनांमध्ये वाढ झाली असून सहिष्णुतेला धक्का लागला आहे

Increased intolerance in India, USCIRF report in 2015 | भारतात 2015 मध्ये वाढली असहिष्णुता, USCIRFचा अहवाल

भारतात 2015 मध्ये वाढली असहिष्णुता, USCIRFचा अहवाल

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 03 - अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता आयोगाने (युएससीआयआरएफ) दिलेल्या अहवालानुसार भारतात 2015मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन करणा-या घटनांमध्ये वाढ झाली असून सहिष्णुतेला धक्का लागला आहे. 2015 मध्ये भारतातील धार्मिक स्वातंत्र्य नकारार्थी मार्गावर होतं असं अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता आयोगाने (युएससीआयआरएफ) आपल्या वार्षिक अहवालात नमूद केलं आहे. 
 
धार्मिक समुदायावर अधिकारी आणि नेत्यांनी उघडपणे बेताल वक्तव्य केली. यामुळे सरकारला सार्वजनिकपणे आपली नाराजी व्यक्त करत कान टोचावे लागले असल्याचंही अहवालात सांगण्यात आलं आहे. भारतातील सद्यपरिस्थिती पाहता 2016 मध्ये भारतातील घटनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार भारताकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे का ? याचा निर्णय घेण्यात येईल. 
 
आयोगाने अमेरिका सरकारला भारतासोबत धार्मिक स्वतंत्रता आणि रणनीतीवर द्विपक्षीय चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वॉशिंग्टन दौ-याच्या एक महिना अगोदर हा अहवाल मांडण्यात आला आहे. 
 
2015 मध्ये धार्मिक सहिष्णुता खालावली आणि धार्मिक स्वतंत्रतेचं उल्लंघन भारतामध्ये वाढलं. अल्पसंख्यांक समाज खासकरुन ख्रिश्चन, मुस्लिम, आणि शीख यांना छळ, हिंसा आणि दहशतीच्या वातावरणाचा सामना करावा लागला. यामध्ये हिंदू राष्ट्रवादी संघटनांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता असा आरोप अहवालातून करण्यात आला आहे. भाजपाच्या सदस्यांनी हिंदू संघटनांना वाचवण्याचा प्रयत्न करत त्यांना पाठिंबा दिला. तसंच वातावरण अजून चिघळावं यासाठी भडकाऊ भाषेचा वापर करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. 
पोलिसांच्या एकतर्फी तपासामुळे तसंच न्याय मिळण्यास होत असलेला उशिर यामुळे अल्पसंख्यांक समाजाला असुरक्षित वाटत आहे. धार्मिक प्रेरणा मिळालेले गुन्हे घडत असताना कोणताच आधार अल्पसंख्यांक समाजाला मिळत नाही आहे असंही अहवलात सांगण्यात आलं आहे. 
 
अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता आयोगाच्या सदस्यांना भारत सरकारकडून व्हिसा नाकारण्यात आला होता. याअगोदरही युपीए सरकारने एकदा व्हिसा नाकारला होता. विशेष म्हणजे युएससीआयआरएफचे अध्यक्ष कटरीना स्वेट चीनसंबंधी एका मुद्यावर चर्चा करण्यासाठी गेल्या आठवड्यात धर्मशाळा येथे आल्या होत्या.  अमेरिका आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता आयोग (युएससीआयआरएफ) अमेरिकन फेडरल गव्हर्नमेंट कमिशनची स्वतंत्र संस्था आहे. जगभरातील लोकांच्या धार्मिक स्वतंत्रतेसाठी लढणे हा या संस्थेचा एकमेव उद्देश आहे.
 

Web Title: Increased intolerance in India, USCIRF report in 2015

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.