दिल्ली-हरियाणा सीमेवर सुरक्षेत वाढ, हरयाणामधील मतदानासाठी पोलीस सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 06:54 PM2019-10-20T18:54:21+5:302019-10-20T18:55:12+5:30
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बेकायदा मद्य वाहतूक रोखण्यासाठी
नवी दिल्ली : हरियाणामध्ये उद्या (सोमवार) २१ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-हरियाणा सीमेवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीच्या सीमा दिल्ली पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ केली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बेकायदा मद्य वाहतूक रोखण्यासाठी दिल्ली-हरियाणा सीमारेषेवर वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. संयुक्त पोलीस आयुक्त शालिनी सिंह म्हणाल्या की, मतदानाच्या २४ तास आधी सीमांवर पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. यंदा वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. हरियाणात निवडणुकीमुळे मद्य विक्रीवर बंदी असल्याने दिल्लीतून मोठ्या प्रमाणात मद्यतस्करी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून सीमारेषेवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीच्या अंतर्गत भागातही पोलीस मद्यतस्करीवर लक्ष ठेवून आहेत.