दक्षिण भारतातील युवकांवर इसिसचा प्रभाव वाढतोय - एनआयए प्रमुख

By admin | Published: December 28, 2015 10:16 AM2015-12-28T10:16:19+5:302015-12-28T10:16:19+5:30

इसिसला भारतात आपली पाळेमुळे रुजवता आली नसली तरी, इसिसच्या धोक्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

Increasing influence of young Indians in South India - NIA chief | दक्षिण भारतातील युवकांवर इसिसचा प्रभाव वाढतोय - एनआयए प्रमुख

दक्षिण भारतातील युवकांवर इसिसचा प्रभाव वाढतोय - एनआयए प्रमुख

Next

ऑनलाइन लोकमत

लखनऊ, दि. २८ -  इसिसला भारतात आपली पाळेमुळे रुजवता आली नसली तरी, इसिसच्या धोक्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. युवकांना इसिसच्या प्रभावापासून दूर ठेवण्याचे आव्हान आज समोर आहे. विशेष करुन दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे असे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) महासंचालक शरद कुमार यांनी सांगितले. लखनऊमध्ये ते एका कार्यक्रमात बोलत होते. 
उत्तरप्रदेश, बिहारपेक्षा दक्षिण भारतातील राज्यांमधील युवक कट्टरपंथीय विचारधारेच्या जाळयात अडकत आहे. इसिस इंटरनेट आणि सोशल मिडीयाचा वापर करुन युवकांना आपल्या जाळयात ओढत आहे. दिशा भरकटलेल्या या युवकांना पुन्हा योग्य वाटेवर आणण्यासाठी केंद्र सरकारने मोहीम सुरु केली आहे.  
भारतीय युवक कट्टरपंथीय विचारधारेकडे झुकण्याचे कारण सामाजिक आणि आर्थिक नसल्याचे शरद कुमार यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Increasing influence of young Indians in South India - NIA chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.