वाढत्या असहिष्णूतेमुळे पत्नीने देश सोडण्याबद्दल सुचवले होते - आमिर खान

By admin | Published: November 24, 2015 08:49 AM2015-11-24T08:49:56+5:302015-11-24T09:26:06+5:30

देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवले होते, असे सांगत आमिर खानने प्रथमच या मुद्यावर मौन सोडले.

Increasing intolerance led to his wife's suggestion to leave the country - Aamir Khan | वाढत्या असहिष्णूतेमुळे पत्नीने देश सोडण्याबद्दल सुचवले होते - आमिर खान

वाढत्या असहिष्णूतेमुळे पत्नीने देश सोडण्याबद्दल सुचवले होते - आमिर खान

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि,. २४ - देशातील वाढत्या असहिष्णूतेविरोधात आवाज उठवणा-या अनेक क्षेत्रातील दिग्गजांच्या यादीत आता अभिनेता आमिर खानचाही समावेश झाला असून या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवल्याचे आमिरने नमूद केले. सोमवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या आमिरने प्रथमच या विषयावर आपले मौन सोडले. तसेच या घटनांच्या विरोधात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीचेही त्याने समर्थन केले. आपली निराशा व्यक्त करण्यासाठी प्रतिभावंत मंडळींसाठी पुरस्कारवापसी हा एक मार्ग असू शकतो, अशा शब्दांत आमिरने त्यांना पाठिंबा दर्शवला.
' या देशात काय घडतयं ते आम्ही रोज वृत्तपत्रातून वाचत असतो, पहात असतो. गेल्या काही महिन्यात देशात घडलेल्या घटनांबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत ते धक्कादायक आहेत. जे घडतयं, त्यामुळे मी चिंतित झालो, हे नाकबूल करणार नाही. विशेषत: गेल्या सहा ते आठ आठवड्यात धएशातील असुरक्षितता, भय वाढले आहे' असे आमिर म्हणाला. 'आपण भारत सोडूया का असा प्रश्न किरणने धास्तीपोटी मला विचारला होता. सभो7वतालच्या वातावरणामुळे ती चिंतातुर झाली, मुलांची तिला काळजी वाटते. रोज पेपर उघडतानाही ती घाबरलेली असते. किरणने मला असा प्रश्न विचारणे माझ्यासाठी धक्कादायक होते, पण भोवती असलेल्या अस्वस्थतेचे ते द्योतक असल्याचे आमिर म्हणाला. 
यावेळी त्याने राजकारण्यांवरही निशाणा साधला. आपवी काळजी घेण्यासाठी आपण निवडून दिलेल्या लोकांनी, नेत्यांनी खंबीरपणे पावले उचलणे, कायदा हातात घेणा-याविरोधात कडक कारवाई करणे अपेक्षित असते. पण ते होत नसल्यामुळेच असुरक्षिततेची भावना वाढत चालली असल्याचे सांगत त्याने राजकारण्यांवर टीका केली. 
दरम्यान या विधानानंतर आमिरवर चहुबाजूंनी टीका होत अाहे. आमिरचे हे वक्तव्य अतिशय दु:खद असून त्याने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी अभिनेता व खासदार मनोज तिवारी यांनी केली आहे. तसेच आमिरला जर भारतात भीती  वाटत असेल तर त्याला जिथे शांती मिळेल, अशा ठिकाणी जाण्यास तो स्वतंत्र असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Increasing intolerance led to his wife's suggestion to leave the country - Aamir Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.