राष्ट्रध्वजातून राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत - ब्रिगेडियर वैष्णव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 02:53 AM2018-01-28T02:53:38+5:302018-01-28T02:54:07+5:30

निगडी येथील भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक एकशे सात मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण झाले असल्याने देशाप्रति राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक शहरवासीयाच्या मनात वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्याचे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व स्पेशल कमांडंट ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांनी केले.

 Increasing the spirit of patriotism by national flag - Brig Vaishnav | राष्ट्रध्वजातून राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत - ब्रिगेडियर वैष्णव

राष्ट्रध्वजातून राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत - ब्रिगेडियर वैष्णव

Next

पिंपरी - निगडी येथील भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक एकशे सात मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण झाले असल्याने देशाप्रति राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक शहरवासीयाच्या मनात वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्याचे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व स्पेशल कमांडंट ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांनी केले.
महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथे देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण व संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन झाले त्या वेळी ते बोलत होते. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास निवृत्त कर्नल सदानंद साळुंके, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, माजी खासदार गजानन बाबर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, जैवविविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहआयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप, अमित गोरखे उपस्थित होते.
ब्रिगेडीयर ओ. पी. वैष्णव म्हणाले, ‘‘भक्ती-शक्ती चौक हा भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेला चौक आहे. या ठिकाणी देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज उभारल्यामुळे शहरातील नागरिकांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल. शौर्य, वीरता, प्रगती, पवित्रता व सत्य यांचे प्रतीक भारतीय राष्ट्रध्वज आहे. भारतीय सैनिक लढाईला जाताना तिरंगा फडकावून येऊ अथवा तिरंग्यात लपेटून येऊ अशी शपथ घेतात. कारगिल युद्धामध्ये विजय प्राप्त करून तेथे तिरंगा ध्वज फडकवला गेला. राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट हेल्मेटवर राष्ट्रध्वजाचे चित्र लावण्यास सुरुवात केली, तेव्हापासून क्रिकेट इतिहासात तिरंगी ध्वजाचे महत्त्व वाढले आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात व कार्यालयात राष्ट्रध्वज लावल्यास राष्ट्रभक्तीची भावना तेवत राहण्यास मदत होईल.’’
महापौर नितीन काळजे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासात या ऐतिहासिक क्षणांची नोंद घेतली जाईल. देशातील सर्वांत उंचीचा हा राष्ट्रध्वज आपली मान अभिमानाने उंचावण्यास प्रेरणा देत राहील.’’
स्थायी समिती सभापती सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘देशातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज पिंपरी-चिंचवड शहरात उभारल्यामुळे येथील प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत झाले आहे.’’
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाच्या अनावरणाने प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली आहे. या ठिकाणी उपस्थित राहणारा प्रत्येक नागरिक हा या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला आहे. हे शहर आपले आहे अशी भावना मनात ठेवून शहराच्या विकासकामात सर्वांनी सहकार्य केल्यास पिंपरी-चिंचवड शहर हे देशातील स्वच्छ, सुंदर व विकसनशील शहर म्हणून ओळखले जाईल.’’
शहरातील मनपा शाळेतील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी तिरंगी वेशभूषा परिधान करून हजारो तिरंगी फुगे आकाशात सोडले. भक्ती-शक्तीचा हा परिसर अवघ्या तिरंग्यात न्हाऊन निघाला होता. सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात भक्ती-शक्तीचा परिसर भारत माता की जय व वंदे मातरमच्या घोषणेने दुमदुमून गेला होता.
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सचिन काटकर यांनी केले. ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या पथकाने ध्वजगीत सादर केले. तर देहूरोड येथील लष्कर बॅण्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. संदीप पंचवाटकर यांचा देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम सादर झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तर आभार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.

देशभक्तीसाठी जागरूकराहा

भक्ती शक्ती चौकातील देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वजाखाली उभे राहून अत्यंत आनंद होत आहे. सर्व देशवासीयांनी भारतीय एकात्मता बाळगली पाहिजे. मानवता हाच खरा धर्म असून, या भावनेमुळेच आपली खरी ओळख समाजात होते. उभारण्यात आलेल्या ध्वज परिसरात स्वच्छता ठेवा. कोठेही घाण करू नका. कचरा टाकण्यासाठी कुंडीचाच वापर करा. स्वच्छतेचे महत्त्व इतरांनाही सांगा. प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान करणे गरजेचे असून, देशभक्ती जागृत ठेवणेही गरजेचे आहे.
- सदानंद साळुंके, निवृत कर्नल

Web Title:  Increasing the spirit of patriotism by national flag - Brig Vaishnav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.