एका रात्रीत नशीब पालटले, तब्बल १४४८ कोटींचे मालक झाले; पण एका चुकीमुळे हात रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 03:44 PM2021-09-27T15:44:14+5:302021-09-27T15:46:25+5:30

एका रात्रीत कोट्यधीश झालेल्या व्यक्तीची गोष्ट; पण आता कागदपत्रांत सगळ्याच गोष्टी अडकल्या

incredible story of a Kerala man and his forgotten fortune now worth Rs 1448 crore | एका रात्रीत नशीब पालटले, तब्बल १४४८ कोटींचे मालक झाले; पण एका चुकीमुळे हात रिकामे

एका रात्रीत नशीब पालटले, तब्बल १४४८ कोटींचे मालक झाले; पण एका चुकीमुळे हात रिकामे

Next

कोच्ची: कोणाचं नशीब कसं आणि केव्हा बदलेल सांगता येत नाही. एका क्षणात रावाचा रंक होऊ शकतो. कधीकधी क्षणात आयुष्य बदलून जातं. सर्वसामान्य आयुष्य जगत असलेली माणूस कोट्यधीश होते. केरळच्या कोच्चीत राहणाऱ्या बाबू जॉर्ज वालावी यांच्यासोबत असाच प्रकार घडला आहे. बाबू एका रात्रीत कोट्यधीश झाले. मात्र आता एका चुकीमुळे त्यांना त्यांचं पैसे मिळण्यात अडथळे येत आहेत.

कोच्चीत वास्तव्यास असलेल्या बाबू जॉर्ज वालावी यांनी ४३ वर्षांपूर्वी ३५०० शेअर्स खरेदी केले. ही गुंतवणूक ते कालांतरानं विसरले. आता त्या शेअर्सची किंमत तब्बल १४४८ कोटींच्या घरात गेली आहे. जॉर्ज आता ७४ वर्षांचे असून कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. '१९७८ मध्ये मी मेवाड ऑईल अँड जनरल मिल्स लिमिटेडचे ३५०० शेअर्स खरेदी केले. त्यावेळी राजस्थानच्या उदयपूरमध्ये असलेल्या कंपनीची शेअर बाजारात नोंद नव्हती. ३५०० शेअर्स खरेदी केल्यानं माझी भागिदारी २.८ टक्के होती,' असं बाबू यांनी सांगितलं.

बघा, आम्ही मरतोय! दोन मुलांना फासाला लटकवून बापानं नातेवाईकांना पाठवला व्हिडीओ

'त्यावेळी पी. पी. सिंघल कंपनीचे मालक होते आणि ते माझे मित्र होते. कंपनीची शेअर बाजारात नोंद नसल्यानं डिव्हिडंट मिळत नव्हता. त्यामुळे ही गुंतवणूक माझ्यासह कुटुंबाच्या लक्षात राहिली नाही. २०१५ मध्ये आम्हाला अचानक याची आठवण झाली आणि आम्ही पडताळणी सुरू केली. कंपनीचं नाव बदलण्यात आलं असून ते पीआय इंडस्ट्रीज करण्यात आल्याचं आम्हाला समजलं. कंपनीची शेअर बाजारात नोंद असल्याची माहितीदेखील मिळाली,' असं बाबू यांनी सांगितलं. 

कंपनीनं चुकीच्या पद्धतीनं बोगस कागदपत्रांचा वापर करून आपले शेअर्स विकल्याचा आरोप त्यांनी केला. तुमचा आता कंपनीत कोणताही हिस्सा नाही. तुमचे शेअर्स १९८९ मध्ये दुसऱ्या व्यक्तीला विकण्यात आले, अशी माहिती कंपनीनं त्यांना दिली. यानंतर २०१६ मध्ये पीआय इंडस्ट्रीजनं बाबू यांना मध्यस्थीसाठी दिल्लीला बोलावलं. मात्र बाबूंनी मध्यस्थीस नकार दिला. कंपनीनं बाबूंकडे असणाऱ्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी दोन मोठे अधिकारी केरळला पाठवले. बाबू यांच्याकडे असलेली कागदपत्रं खरी असल्याचं कंपनीनं मान्य केलं. मात्र कंपनी बाबू यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे बाबू यांनी सेबीचा दरवाजा ठोठावला आहे.

Web Title: incredible story of a Kerala man and his forgotten fortune now worth Rs 1448 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.