खरंच अंकित शर्मा यांची हत्या करणाऱ्यांनी दिले 'जय श्रीराम'चे नारे?... जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 17:03 IST2020-02-29T16:52:31+5:302020-02-29T17:03:59+5:30
याआधी देखील अंकूरने गर्दीच्या हातून माझ्या भावाला मारण्यासाठी ताहीर हुसेनने षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता. या संदर्भात द वॉल स्ट्रीट जर्नलची संपर्क साधण्यात आला. मात्र त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही.

खरंच अंकित शर्मा यांची हत्या करणाऱ्यांनी दिले 'जय श्रीराम'चे नारे?... जाणून घ्या सत्य
नवी दिल्ली - दिल्लीत झालेल्या धार्मिक हिंसेत मरण पावलेल्या इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीच्या अंकित शर्मा या कर्मचाऱ्याच्या हत्येसंदर्भात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अंकित यांच्यावर हल्ला 'जय श्रीराम'चे नारे लगावणाऱ्यांनी केला असा दावा अंकूर यांनी केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. मात्र यात तथ्य नसून हे वृत्त चुकीचे असल्याचे अंकूर यांनी म्हटले आहे.
'द वॉल स्ट्रीट' जर्नलच्या रिपोर्टनुसार अंकितच्या भावाने सांगितले की, अंकित जेव्हा घरी परतत होता. त्यावेळी हिंसा करणाऱ्या एका समूहाने दगडफेक सुरू केली आणि त्याला एका गल्लीत नेले. हिंसा करणाऱ्यांकडे दगडं, काठ्या, चाकू आणि तलवारी होत्या. ते जोरजोरात जय श्रीराम, जय श्रीरामचे नारे लावत होते. यापैकी काहींनी हेल्मेट परिधान केलेले होते, असा दावाही त्या वृत्तात करण्यात आला होता. ‘India’s Ruling Party, Government Slammed Over Delhi Violenc या शिर्षकाखाली हे वृत्त होते.
'द वॉल स्ट्रीट' जर्नलच्या रिपोर्टचा स्क्रिनशॉट, केवळ 'द वॉल स्ट्रीट' सबस्क्राईब करणाऱ्यांनाच हा रिपोर्ट वाचता येऊ शकतो.
दरम्यान अंकितचे भाऊ अंकूर यांच्याशी फॅक्टचेक अंतर्गत संवाद साधण्यात आला. त्यावेळी अंकूर यांनी द वॉल स्ट्रीट जर्नलचा रिपोर्ट फेटाळून लावला. द वॉल स्ट्रीट जर्नल खोटं सांगत आहे. मी सर्वांना हेच सांगत आलो की, माझ्या भावावर आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसेनच्या लोकांनी हल्ला केला होता. तसेच अंकितला ओढत हुसेनच्या घरी नेण्यात आले होते.
याआधी देखील अंकूरने गर्दीच्या हातून माझ्या भावाला मारण्यासाठी ताहीर हुसेनने षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता. प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टसंदर्भात द वॉल स्ट्रीट जर्नलशी संपर्क साधण्यात आला. मात्र त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही.