थकित ऊस बिलासाठी आंदोलन करणार्या २२ शेतकर्यांची निदोर्ेष मुक्तता
By admin | Published: January 31, 2017 02:06 AM2017-01-31T02:06:21+5:302017-01-31T02:06:21+5:30
चंदगड : दौलत साखर कारखान्याने शेतकर्यांची प्रलंबित ऊसबिले द्यावीत, या मागणीसाठी कारखान्याचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या निवासस्थानासमोर ॲड. संतोष मळवीकर व अन्य २२ शेतकर्यांनी आंदोलन व रास्ता रोको केला होता. यामुळे चंदगड पोलिसांनी २२ शेतकर्यांवर गुन्हा दाखल केला होता. या आंदोलनातील सर्वांची चंदगड न्यायालयाचे न्यायाधीश एम. डी. ठांेबरे यांनी निदार्ेष मुक्तता केली. सहा वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याला न्याय मिळाल्याने शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
Next
च दगड : दौलत साखर कारखान्याने शेतकर्यांची प्रलंबित ऊसबिले द्यावीत, या मागणीसाठी कारखान्याचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या निवासस्थानासमोर ॲड. संतोष मळवीकर व अन्य २२ शेतकर्यांनी आंदोलन व रास्ता रोको केला होता. यामुळे चंदगड पोलिसांनी २२ शेतकर्यांवर गुन्हा दाखल केला होता. या आंदोलनातील सर्वांची चंदगड न्यायालयाचे न्यायाधीश एम. डी. ठांेबरे यांनी निदार्ेष मुक्तता केली. सहा वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याला न्याय मिळाल्याने शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.सुहास पाटील, राजाराम गावडे, सुनील नाडगौडा, सातर्डेकर, मातवंडकर, दयानंद गावडे, शंकर पाटील, बाळू सुतार, परशराम मळवीकर, पांडुरंग बाबू पवार, सखाराम मळवीकर, धाकलू गावडे अशा अनेक शेतकर्यांवर चंदगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.२०१५ मध्ये राज्य सरकारने सामाजिक आंदोलनातून कोर्टात दाखल झालेले खटले मागे घेण्याबाबत अध्यादेश काढला होता. त्यानुसार ॲड. मळवीकर व अन्य आंदोलनकर्त्यांवरील खटला शासनाने माघार घेण्याचे ठरवले. शासनाने घेतलेल्या निर्णयाची पुष्ठी करत सर्व आंदोलनकर्त्यांवरील पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यामधून निदार्ेष मुक्तता केली. याकामी ॲड. के.एस. सुरूतकर यांनी कोणतीही फी न आकारता केस चालविली होती. (प्रतिनिधी)