Gallantry Medals 2021: गलवान खोऱ्यात चीनला नडलेले; 20 जवानांना वीरतेचे पोलीस मेडल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 02:38 PM2021-08-14T14:38:35+5:302021-08-14T14:40:01+5:30

ITBP personnel awarded by Gallantry medals: आयटीबीपीने यांची माहिती दिली. लडाखच्या भारत-चीन सीमेवर गेल्या वर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यातील वेगवान प्रवाहाच्या नदीमध्ये भारतीय सैनिकांवर चीनने भ्याड हल्ला केला होता. यावेळी भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांचा वार माघारी परतवून लावताना चिनी सैनिकांचे मोठे नुकसान केले होते.

Independence Day: 20 ITBP personnel awarded by Gallantry medals for fighting Chinese PLA in Ladakh Galwan | Gallantry Medals 2021: गलवान खोऱ्यात चीनला नडलेले; 20 जवानांना वीरतेचे पोलीस मेडल जाहीर

Gallantry Medals 2021: गलवान खोऱ्यात चीनला नडलेले; 20 जवानांना वीरतेचे पोलीस मेडल जाहीर

Next

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्ताने 1380 पोलीस पदकांची (gallantry medals) घोषणा करण्यात आली. यामध्ये आयटीबीपीच्या 23 जवानांना स्वातंत्र्य दिनी वीरता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये 20 जवान हे गेल्या वर्षी चीनच्या सैनिकांना गलवान खोऱ्यात भिडले (galwan valley clash) होते आणि वीरमरण पत्करले होते. (20 ITBP personnel who fought Chinese troops in Ladakh get gallantry medals)

आयटीबीपीने यांची माहिती दिली. लडाखच्या भारत-चीन सीमेवर गेल्या वर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यातील वेगवान प्रवाहाच्या नदीमध्ये भारतीय सैनिकांवर चीनने भ्याड हल्ला केला होता. यावेळी भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांचा वार माघारी परतवून लावताना चिनी सैनिकांचे मोठे नुकसान केले होते. चीनने अद्याप किती सैनिक मारले गेले याचा आकडा जाहीर केलेला नसला तरीदेखील 40 हून अधिक सैनिक मारले गेल्याचे सांगितले जाते. 
आयटीबीपीने सांगितले की सीमेवरील संघर्ष आणि सुरक्षा कर्तव्यांसाठी जवानांना आतापर्यंत दिले गेलेले हे सर्वाधिक वीरता पदक आहेत. दर वर्षी स्वातंत्र्य दिनी देशाची सेवा आणि बलिदानासाठी वीरता पुरस्काराची घोषणा केली जाते. 

रात्रभर लढत होते जवान
पाण्याचा वेगवान प्रवाह आणि त्यात चीनी सैनिकांनी केलेला पाठीत वार या परिस्थितीतही भारतीय जवानांनी शौर्य गाजवले होते. शस्त्रास्त्रांचा वापर न करता चिनी सैनिकांसोबत या जवानांनी तब्बल 17 ते 20 तास लढाई केली. चीनी सैनिकांनी दगड, लोखंडी काटेरी जाळ्या असलेले रॉड आदींनी हल्ला केला होता. रक्तबंबाळ झाले तरही या जवानांनी चिनी सैनिकांना चोख प्रत्यूत्तर दिले. या झटापटीत आपले 20 जवान शहीद झाले. 

1380 पदके कोणासाठी...
यावेळी 1380 पदके दिली जाणार आहेत. यामध्ये वीरतेसाठी राष्ट्रपतींचे 2 पोलीस पदक, वीरतेसाठी 628 पोलीस पदक, विशिष्ट सेवेसाठी 88 राष्ट्रपती पोलीस पदक आणि उत्कृष्ट सेवेसाठी 662 पोलीस पदक देण्यात येणार आहेत. 628 पोलीस पदकांपैकी जम्मू-कश्मीर 256, सीआरपीएफला 151, आयटीबीपीला 23 वीरता पुरस्कार दिले जाणार आहेतय याशिवाय ओडिशा पोलीस 67, महाराष्ट्र पोलीस 25 आणि छत्तीसगड पोलिसांना 20 पुरस्कार दिले जाणार आहेत.

Web Title: Independence Day: 20 ITBP personnel awarded by Gallantry medals for fighting Chinese PLA in Ladakh Galwan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.