स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचे कारस्थान, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 03:31 PM2020-08-13T15:31:14+5:302020-08-13T16:33:40+5:30

खलिस्तानी दहशतवादी संघटना असलेल्या शीख फॉर जस्टिसचा दहशतावादी गुरवतपंत सिंग पन्नू याने या संदर्भातील एक व्हि़डीओ शेअर केला आहे.

Independence Day 2020 : Conspiracy to hoist Khalistan flag on Red Fort on Independence Day, security alert | स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचे कारस्थान, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचे कारस्थान, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

googlenewsNext
ठळक मुद्देलाल किल्ल्यावरच खलिस्तानचा झेंडा फडवण्याचे कारस्थान दहशतवादी संघटनानांनी आखले आहे १४, १५ आणि १६ ऑगस्टदरम्यान लाल किल्ल्यावर खलिस्थानचा झेंडा फडकवणाऱ्या शीख व्यक्तीला सव्वा लाख अमेरिकन डॉलर बक्षीस देण्याची घोषणाया कारस्थानाचा सुगावा लागल्यानंतर आयबीने जारी केला लाल किल्ल्याच्या सुरक्षेबाबतचा अलर्ट

नवी दिल्ली - देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन काही तासांवर आला असतानाचा दहशतवादी संघटनांच्या धक्कादायक कारस्थानाचा सुगावा सुरक्षा यंत्रणांना लागला आहे. स्वातंत्र्य दिनी देशातील मुख्य कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असणाऱ्या लाल किल्ल्यावरच खलिस्तानचा झेंडा फडवण्याचे कारस्थान दहशतवादी संघटनानांनी आखले आहे. दरम्यान या कारस्थानाचा सुगावा लागल्यानंतर आयबीने लाल किल्ल्याच्या सुरक्षेबाबतचा अलर्ट जारी केला आहे.

अमेरिकास्थित शीख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांपैकी एक असलेल्या गुरुवतपंत सिंग पन्नू याने १४, १५ आणि १६ ऑगस्टदरम्यान लाल किल्ल्यावर खलिस्थानचा झेंडा फडकवणाऱ्या शीख व्यक्तीला सव्वा लाख अमेरिकन डॉलर बक्षीस देण्याची घोषणा केली आहेत. खलिस्तानी दहशतवादी संघटना असलेल्या शीख फॉर जस्टिसचा दहशतावादी गुरवतपंत सिंग पन्नू याने या संदर्भातील एक व्हि़डीओ शेअर केला आहे. त्यात त्याने ही घोषणा केली आहे.

गुरवतपंत सिंग पन्नू याचे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय हिच्याशी संबंध आहेत. या संघटनेसोबत मिळून गुरुवतपंत हा रेफरेंडम २०२० ही मोहीम चालवत आहे. दरम्यान, हा व्हिडीए प्रसिद्ध झाल्यानंतर सुरक्षा यंत्रण अलर्टवर आहेत. दरम्यान, रेफरेंडम २०२० बाबत दिल्ली, पंजाब आणि हरयाणामधील लोकांना गुरुवतपंत सिंग पन्नूचे ऑटोमॅटिक कॉल येत आहेत. त्यांचा तपास एनआयएकडून करण्यात येत आहे.



हल्लीच गुरुवतपंत सिंग पन्नूने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्याने दिल्लीला खलिस्तान बनवण्याची कल्पना मांडली होती. मात्र १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचे आवाहन त्याने केल्यापासून लाल किल्ल्याच्या आसपास गुप्तहेर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेत किल्ल्याच्या आसपासच्या पररिसरातील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

Web Title: Independence Day 2020 : Conspiracy to hoist Khalistan flag on Red Fort on Independence Day, security alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.