स्वातंत्र्य दिनी नेपाळच्या पंतप्रधानांचा मोदींना फोन, महत्त्वाच्या विषयावर झाली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 04:01 PM2020-08-15T16:01:48+5:302020-08-15T16:05:39+5:30
भारत आणि नेपाळच्या संबंधांमध्ये गेल्या काही दिवसांत कटुता आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ओली यांनी पंतप्रधान मोदींना केलेला फोन आणि चर्चा महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.
नवी दिल्ली - सीमावाद आणि नेपाळच्या चीनसोबतच्या आत्यंतिक जवळीकीमुळे सध्या भारत आणि नेपाळमधील द्विपक्षीय संबंध कमालीचे बिघडलेले आहेत. मात्र अशा परिस्थितीत आज भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. यावेळी ओलींनी मोदींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील अस्थायी सदस्य देशांमध्ये भारताच्या झालेल्या निवडीसाठी त्यांनी भारताचे अभिनंदन केले.
भारत आणि नेपाळच्या संबंधांमध्ये गेल्या काही दिवसांत कटुता आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ओली यांनी पंतप्रधान मोदींना केलेला फोन आणि चर्चा महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. दरम्यान, आज फोनवरून झालेल्या चर्चेत नरेंद्र मोदी आणि ओली यांनी कोरोनामुळे दोन्ही देशांत उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोरोनाचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत एकमत दर्शवले. तसेच याबाबात भारत नेपाळला सातत्याने सहकार्य करत राहील, असे आश्वासन मोदींनी दिले.
The leaders expressed mutual solidarity in the context of the efforts being made to minimise the impact of #COVID19 pandemic in both countries. PM Modi offered India’s continued support to Nepal in this regard: Ministry of External Affairs (MEA) https://t.co/4T2Cxw4Qy1
— ANI (@ANI) August 15, 2020
दरम्यान, मे महिन्यात भारताने लिपुलेख येथील रस्त्याचे उद्घाटन केल्यानंतर भारत आणि नेपाळमधील वाद उफाळून आला होता. कालापानी लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भारतातील भागांवर नेपाळने दावा केला होता. तसेच संविधान संशोधन करून हे भाग आपल्या नकाशात समाविष्ट केले होते. मात्र नेपाळच्या या कृत्याचा भारताने तीव्र निषेध केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी