Independence Day 2021 : 'जर आपल्याकडे स्वत:ची लस नसती तर…'; पंतप्रधानांनी केलं लसीकरण मोहिमेचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 08:58 AM2021-08-15T08:58:20+5:302021-08-15T09:26:23+5:30
Celebrating Happy Independence Day 2021 : कोरोना संकटात देशात होत असलेल्या लसीकरण मोहिमेचा मोदींनी आपल्या भाषणात विशेष उल्लेख केला आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण (Happy independence day 2021) केल्यानंतर देशवासीयांना संबोधित केलं आहे. देश सध्या कोरोनाच्या (Corona Virus) महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना संकटात देशात होत असलेल्या लसीकरण (Corona Vaccine) मोहिमेचा मोदींनी आपल्या भाषणात विशेष उल्लेख केला आहे. "विकासाच्या मार्गावरून चालत असतानाच देशासमोर कोरोनाचे संकट आले. देशवासियांनी संयम आणि धैर्याने संकटाचा सामना केला आहे. कोरोनाविरोधाच्या लढाईत आम्ही सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत देशातील 54 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे" असं म्हटलं आहे.
"आपल्या संशोधकांच्या ताकदीचा हा परिणाम आहे. म्हणूनच भारताला कोरोना लसीसाठी इतर कोणत्या देशावर अवलंबून राहावं लागलं नाही. तुम्ही कल्पना करा की जर भारताकडे स्वत:ची लस नसती, तर काय झालं असतं? पोलिओची लस मिळवण्यात आपले किती वर्ष निघून गेले. एवढ्या संकटात जगात महामारी असताना आपल्याला लस कधी मिळाली असती? पण आज अभिमानाने सांगता येतं की जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू आहे" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. तसेच "येथून पुढच्या 25 वर्षांचा प्रवास भारताचा सृजनाचा अमृतकाळ आहे. या अमृतकाळामध्ये आपल्या संकल्पांची सिद्धी आम्हाला स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत घेऊन जाईल" असं देखील मोदींनी म्हटलं आहे.
Indians have fought this battle (COVID) with a lot of patience. We had many challenges but we worked with extraordinary pace in every area. It's a result of strength of our industrialists & scientists, that today India doesn't need to depend on any other nation for vaccines: PM pic.twitter.com/BI8H60fZBI
— ANI (@ANI) August 15, 2021
"21 व्या शतकामध्ये भारताला एका नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी भारताच्या सामर्थ्याचा योग्य आणि पूर्ण वापराची आवश्यकता आहे. त्यासाठी जे घटक, क्षेत्र मागे आहे त्यांची हँड होल्डिंग करणे आवश्यक आहे. आता आपण सेचुरेशनच्या दिशेने गेले पाहिजे. सर्व गावांमध्ये रस्ते असावेत, सर्व कुटुंबांकडे बँक अकाऊंट असावेत. सर्व लाभार्थ्यांकडे आयुष्मान भारत कार्ड असावे, सर्व पात्र लाभार्थ्यांकडे उज्ज्वला योजनेचे गॅस कनेक्शन असावे. देशातील लहान शेतकरी हा देशाची शान ठरावा हे आमचे स्वप्न आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये देसातील लहान शेतकऱ्यांच्या सामूहिक शक्तीला अधिक वाढवावे लागेल. त्यांना अधिक सुविधा द्याव्या लागतील" असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
We can proudly say that the largest COVID19 vaccination program is being run in India today. More than 54 crore people have received vaccine doses so far: PM Modi at Red Fort#IndiaAt75pic.twitter.com/5V45a8QEFX
— ANI (@ANI) August 15, 2021
'हे वर्ष नवीन ऊर्जा, चेतना घेऊन येईल'; पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल. जय हिंद!" असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून देशाला पदके जिंकून देणाऱ्या खेळाडूंचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला आहे. तसेच स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत असताना फाळणीचे दु:ख देशवासियांच्या मनात ताजे आहे. त्यामुळे आमच्या सरकारने 14 ऑगस्ट हा विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून साजरा केला जाईल असं म्हटलं आहे.
Independence Day 2021 : "देशवासियांनी संयम आणि धैर्याने कोरोना संकटाचा सामना केला"#IndependenceDayIndia2021#IndependenceDay#NarendraModihttps://t.co/aB3yX5yTXj
— Lokmat (@MiLOKMAT) August 15, 2021