PM मोदी लाल किल्ल्यावरून असं काय बोलले? की समोर बसलेले CJI चंद्रचूड यांनी हात जोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 10:47 AM2023-08-15T10:47:37+5:302023-08-15T10:49:23+5:30
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मातृभाषेतून शिक्षणाचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, आम्ही मातृभाषेतून शिकविण्याला प्राधान्य दिले आहे...
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वतंत्र्य दिना निमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मातृभाषेतून शिक्षणाचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, आम्ही मातृभाषेतून शिकविण्याला प्राधान्य दिले आहे. मुलांना मातृभाषेतून वाचता यायला हवे. आम्ही सर्वोच्च न्यायालयालाही धन्यवाद देतो. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आता ते जो निकाल देतील त्याचा ऑपरेटिव्ह भाग न्यायालयात आलेल्याला त्याच्याच भाषेत उपलब्ध होईल.
मातृभाषेला मोठे महत्वं -
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज मातृभाषेचे महत्व वाढत आहे. त्यांनी (नरेंद्र मोदी) सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक भाषेत जजमेन्टच्या ऑपरेटिव्ह संदर्भात भाष्य केले, तेव्हा सीजेआय चंद्रचूड तेथेच होते. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या या भाष्यावर हात उचलून अभिवादन केले. महत्वाचे म्हणजे, सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्थानिक भाषांमध्ये शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे.
देशाच्या सीमा पूर्वीपेक्षाही अधिक सुरक्षित -
मोदी म्हणाले, आपल्या देशाच्या सीमा पूर्वीपेक्षाही अधिक सुरक्षित झाल्या आहेत. लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी आणि आपले सैन्य युद्धासाठी नेहमी सज्ज असावे, यासाठी आपल्या सैन्यात सातत्याने सुधारणा होत आहेत. आपण आधी रोज ऐकत होतो, येथे बॉम्ब स्फोट झाला, तेथे बॉम्ब स्फोट झाला. ठीक-ठीकाणी लिहिलेले असायचे, बॅगला स्पर्श करू नका. आज देश शांतता अनुभवत आहे. साखळी बॉम्ब स्फोट आता भूतकाळातल्या गप्पा झाल्या आहेत. निर्दोष नागरिकांचा होणारा मृत्यू, आता भूतकाळातील गोष्टी झाल्या आहेत. आज देशातील दहशतवादी हल्ल्यात मोठी घट झाली आहे. नक्षलग्रस्त भागांतही मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाले आहे. परिवर्तनाचे वातावरण आहे.
हजार-बाराशे वर्षांपूर्वी या देशावर आक्रमण झाले अन्... -
मोदी म्हणाले, "आपण जेव्हा इतिहासावर दृष्टी टाकतो, तेव्हा इतिहासात काही प्रसंग असे येतात, जे आपली कधीही न पुसली जाणारी छाप सोडून जातात आणि त्याचा परिणाम वर्षानू वर्षे राहतो. कधी कधी ती फार छोटीशी घटना वाटते. मात्र ती नंतर अनेक समस्यांचे मूळ बनते. हजार बाराशे वर्षांपूर्वी या देशावर आक्रमण झाले. एका छोट्याशा राजाचा पराभव झाला. मात्र, तेव्हा माहीतही नव्हते, की एक घटना भारताला हज वर्षाच्या गुलामीत अडकवेल आणि आपण गुलामीत अडक केलो. जे आले ते लुटत गेले, ज्याला वाटले, आले आणि आपल्यावर येऊन स्वार झाले. बंधूंनो घटना छोटी का असेना. पण तीने हजार वर्षे प्रभाव सोडला."
...आणि देशातील नारी शक्ती, युवा शक्ती, शेतकरी, देशासाठी उभे राहिले -
"मी आज याचा उल्लेख यासठी करत आहे, की भारताच्या वीरांनी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी जबरदस्त संघर्ष केला. बलिदान दिले. मा भारती बेड्यांमधून मुक्त होण्यासाठी उभी राहिली होती आणि देशातील नारी शक्ती, देशातील युवा शक्ती, देशातील शेतकरी, मजदूर, असे अनेक लोक देशासाठी उभे राहिले. अनेक जण बलिदानासाठी तयार झाले होते. एक फौजच तयार झाली होती. हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होते," असे मोदी म्हणाले.