Independence Day: स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात भारत अंतराळात तिरंगा फडकावेल- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 10:13 AM2018-08-15T10:13:47+5:302018-08-15T14:04:10+5:30
2022 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात भारत अंतराळात तिरंगा फडकावेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली- 2022 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात भारत अंतराळात तिरंगा फडकावेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचंही मोदींनी कौतुक केलं आहे. मी देशवासीयांना आनंदवार्ता देऊ इच्छितो की, 2022मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचा जल्लोष करत असेल, त्यापूर्वीच भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)चा अंतराळात पोहोचले.
भारताचा पुत्र किंवा पुत्री नक्कीच अंतराळाचा तिरंगा फडकावेल. त्यानंतर अंतराळात मानवाला पोहोचणारा जगात भारत हा चौथा देश म्हणून नावारुपाला येणार आहे. शास्त्रज्ञांनी 100हून अधिक सॅटेलाइट अवकाशात पोहोचवल्यानंतर पूर्ण जगभरातून त्याचं कौतुक झालं. आता अंतराळात मानवाला पाठवण्याचं भारताचं लक्ष्य आहे. 12 एप्रिल 1961ला रशियाचे अवकाश शास्त्रज्ञ युरी गागरिन यांनी अंतराळात प्रवेश केला होता. अंतराळात जाणारे ते जगातील पहिले व्यक्ती ठरले होते.
Independence Day Updates : '‘तिहेरी तलाकविरोधात आम्ही तो कायदा करणारच'
Independence Day : पंतप्रधान मोदींनी केली 'आयुष्यमान भारत' योजनेची घोषणा, पण...
‘बीज से बाजार तक’ याअंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं ध्येय आहे. 2022 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात किंवा शक्य झालं तर त्याआधीच भारत अंतराळात तिरंगा फडकवेल, अशा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाआधी कवायत करण्यात आली असून, लोकांनी मोठी गर्दी केली आहे. लाल किल्ल्यावरूनच मोदी पाचवं आणि शेवटचं भाषण करत आहेत. तिन्ही सेना दलांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित आहेत. लाल किल्ला परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनानिमित्तानं देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.