महाराष्ट्रातील पोलिसांचा सन्मान; ८४ राष्ट्रीय पदके जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 05:26 AM2022-08-15T05:26:16+5:302022-08-15T05:26:53+5:30

Independence Day : जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना सर्वाधिक १२५ पोलीस पदके व त्यानंतर महाराष्ट्राला ८४ पोलीस पदके जाहीर झाली. निमलष्करी दलांमध्ये सीआरपीएफला १७१ व त्यानंतर बीएसएफला ७० पोलीस पदके मिळाली आहेत.

Independence Day : Honor of Police in Maharashtra; 84 National Medals announced | महाराष्ट्रातील पोलिसांचा सन्मान; ८४ राष्ट्रीय पदके जाहीर

महाराष्ट्रातील पोलिसांचा सन्मान; ८४ राष्ट्रीय पदके जाहीर

googlenewsNext

नवी दिल्ली/ मुंबई  : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील १०८२ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली. त्यात महाराष्ट्रातीलपोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी तीन राष्ट्रपती पदके, ४२ शौर्य पदके व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ३९ पदकांचा बहुमान मिळाला.

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना सर्वाधिक १२५ पोलीस पदके व त्यानंतर महाराष्ट्राला ८४ पोलीस पदके जाहीर झाली. निमलष्करी दलांमध्ये सीआरपीएफला १७१ व त्यानंतर बीएसएफला ७० पोलीस पदके मिळाली आहेत. जम्मू-काश्मीरने सर्वाधिक पोलीस पदके मिळविली असून, त्यात १०८ शौर्य पदके, उल्लेखनीय सेवेसाठी २ राष्ट्रपती पदके, गुणवत्तापूर्ण सेवेसाठी १५ पदकांचा समावेश आहे. सीबीआयला ३० पोलीस पदकांचा बहुमान मिळाला आहे.

एकूण पोलीस पदकांमध्ये ३४७ शौर्य पदके, उल्लेखनीय सेवेसाठी ८७ राष्ट्रपती पदके व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ६४८ पोलीस पदकांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. निमलष्करी दलांमध्ये सर्वात जास्त १०९ शौर्य पदके सीआरपीएफला मिळाली. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)ला १९, तर इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) व सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांना प्रत्येकी ६ शौर्य पदके मिळाली. 

राज्यातील तिघांना सेवेसाठी राष्ट्रपती पदक
महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदके मिळाली. त्यात सुनील कोल्हे (सहआयुक्त, राज्य गुप्तचर विभाग, कुलाबा), प्रदीप कन्नलू (सहायक आयुक्त, वायरलेस विभाग, ठाणे), मनोहर धनावडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ओशिवरा पोलीस ठाणे, मुंबई) यांचा समावेश आहे.

परराज्यातील मराठी अधिकाऱ्यांचा सन्मान
हरयाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक श्रीकांत जाधव (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाले. तेलंगणातील अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी महेश भागवत (हैदराबाद परिक्षेत्रातील रचाकोंडाचे पोलीस आयुक्त) यांनाही हेच पदक जाहीर झाले आहे.

Web Title: Independence Day : Honor of Police in Maharashtra; 84 National Medals announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.