Independence Day : देशभरात 72व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 06:17 AM2018-08-15T06:17:10+5:302018-08-15T06:18:30+5:30
भाजराचा 72 वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्तव विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित होणार आहे.
नवी दिल्ली - भाजराचा 72 वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्तव विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित होणार आहे. यावेळी देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात राजभवनामध्ये राज्यपालांच्या हस्ते तर विधिमंडळ परिसरात मुख्यमंत्र्याच्या हस्ते ध्वजवंदन होईल.
अन्य महत्त्वाच्या नेत्यांमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह भाजपा मुख्यालयात, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करतील. स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला संसद, राष्ट्रपती भवन, तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह विविध ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व महत्त्वाची ठिकाणे, रेल्वे स्थानक, गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. नागरिकांनी अफवेला बळी न पडता स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करावा, संशयास्पद वस्तू, व्यक्तीबाबत माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले. आंदोलने, मोर्चे, नालासोपाऱ्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जप्त केलेल्या स्फोटकांच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता बाळगण्याच्या सूचना आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह जलद प्रतिसाद दल श्वानपथक, बीडीडीएसचे पथक गस्त घालत आहेत.
Security has been tightened in Mumbai for #IndiaIndependenceDay, visuals from Eastern Express Highway. #Maharashtrapic.twitter.com/wVAlF46bpJ
— ANI (@ANI) August 14, 2018